28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रड्रॅगनने भारताच्या २६ चौक्या गिळल्या; पण सरकार म्हणतं आम्ही एक इंचही जमीन...

ड्रॅगनने भारताच्या २६ चौक्या गिळल्या; पण सरकार म्हणतं आम्ही एक इंचही जमीन नाही गमावली

पूर्व लद्दाख येथील काराकोरमची खिंड ते चुमुर दरम्यान असलेल्या भारताच्या ६५ टेहळणी चौक्यांपैकी २६ चौक्या चिनी ड्रॅगनने गिळंकृत केल्या आहेत. लेह लद्दाखचे पोलीस निरीक्षक पी.डी. नित्या यांनी ही माहिती दिली आहे. दिल्लीत मागील आठवड्यात देशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे वार्षिक संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल (Ajit Doval) हे देखील उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या अहवालात चीनच्या काव्याबाबत सावध करण्यात आले आहे. (Dragon swallowed 26 posts of India)

काराकोरमची खिंड ते चुमुर दरम्यान ६५ टेहळणी चौक्या होत्या. त्या सर्व भारताच्या ताब्यात होत्या. पण त्यातील २६ चौक्या भारताने गमावल्या असल्याची धक्कादायक माहिती पोलीस निरीक्षक पी.डी. नित्या यांनी अहवालात उघड केली आहे. मात्र, हा अहवाल सादर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरक्षा मंत्रालयाने असे काही घडलेच नसल्याचे म्हंटले आहे. भारताने लद्दाखमधील एक इंच जमीनही गमावलेली नाही. काही ठिकाणी दोन्ही सैन्यांची टेहळणी थांबवण्यात आली आहे. पण या ठिकाणी चिनी सैन्याची जितकी उपस्थिती आहे तितकीच उपस्थिती भारतीय सैन्यदलाचीदेखील आहे, असे सुरक्षा मंत्रालयाने म्हंटले आहे.

अहवालात म्हंटले आहे की, “नंतर चीन आपल्याला हे कथित सत्य स्वीकारण्यास भाग पाडेल की या क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून भारतीय सुरक्षा दले अथवा भारतीय नागरिकांचे अस्तित्वच नव्हते. या क्षेत्रात केवळ चीनचेच वास्तव्य होते. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांच्या नियंत्रणाखाली असलेल्या क्षेत्रात बदल होईल. कालांतराने भारत या क्षेत्रांवरील आपले नियंत्रण गमावून बसेल.”  पी. दि. नित्य यांनी आपल्या अहवालात असेही म्हंटले आहे की, गलवान घाटीतही चीनच्या याच रणनीतीचा अनुभव आपण घेतला आहे. २०२० मध्ये गलवान घाटीत भारतीय सैन्य आणि चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्ये हिसंक संघर्ष झाला होता. यामध्ये २० भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते.

हे सुद्धा वाचा

हुकूमशहांच्या हातात देशाचे प्रजासत्ताक; या दडपशीलाच ‘लोकांचे राज्य’ म्हणायचे का? नरेंद्र मोदी उत्तर द्या!

IAS डॉ. राजेश देशमुख यांना राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

BEST झालं राव: नव्या मेट्रोमुळे बेस्टला आले ‘अच्छे दिन’

 

पी.डी. नित्यांनी चुकीचा अहवाल सादर केला का?
भारताने लद्दाखमधील आपली एक इंचही जमीनही गमावली नसल्याचे सुरक्षा मंत्रालय म्हणत आहे. पण दिल्लीत मागील आठवड्यात झालेल्या देशातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वार्षिक संमेलनात पी.डी. नित्यांनी जो अहवाल सादर केला तो चुकीचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांच्या उपस्थितीत हा अहवाल सादर करण्यात आला होता. त्या अहवालातील माहितीबाबत आता साशंकता निर्माण झाली आहे.

चीनची कुटील रणनीती
चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने दोन्ही देशांदरम्यान असलेल्या बफर झोनचा फायदा उठवत उंचावरील शिखरांवर उच्च क्षमतेचे कॅमेरे बसविले आहेत. त्याद्वारे त्यांना भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येते. मात्र, बफर झोनमधील भारताच्या हालचालींवर चीन नेहमीच आक्षेप नोंदवत आला आहे. हे आमचे क्षेत्र असल्याचा कांगावा करून आणखी ‘बफर’ क्षेत्र तयार करण्यासाठी भारतीय सैन्य दलांना माघारी जाण्यास सांगण्यात येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी