29 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची भाजपला खात्री

राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची भाजपला खात्री

टीम लय भारी

नवी दिल्ली: राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला आज सकाळी 10 वाजता सुरुवात झाली. राष्ट्रपती पदाची ही 15 वी निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांनी संसद भवनात मतदान केले. योगी अदित्यनाथ यांनी लखनऊ विधानसभेमध्ये मतदान केले. बिहारचे खासदार मिथिलेश कुमार यांनी स्टेचरवर येऊन मतदान केले. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत. तर विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत द्रौपदी मुर्मूंच्या विजयाची भाजपला खात्री आहे. शिवसेने देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे.

आज 21 जुलैला मतमोजणी होणार आहे. तर 25 जुलैला शपथविधी होणार आहे. शुभेंदु अधिकारी, मनोज तिग्गा आणि स्वप्न मुलूमदार यांच्यावर क्राॅस वोटिंग करण्याची जबाबदारी आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिल्लीमध्ये संसद भवन परिसरात मतदान केले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जयपूरमध्ये मतदान केले. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अहमदाबादमध्ये मतदान केले. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकला वेगळेपद आहे. कारण यावेळच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या अदिवासी महिलेला एनडीएने उभे केले आहे. स्वातंत्र दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने एक आदिवासी महिला प्रतिनिधीत्व करणार आहे.

हे सुध्दा वाचा:

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

‘काय त्या स्टोऱ्या, काय त्या फोकनाड्या, काय ती गरीबी, एकदमच वोक्केमंदी!’ शिंदेगटाविरोधात नरकेंचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी