27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रद्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा

द्रौपदी मुर्मू यांचा मुंबई दौरा

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा आज मुंबई दौरा आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दुपारी नितीन गडकरी यांच्याबरोबर त्यांचे स्नेहभोजन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आदिवासी लोकनृत्यांचे आयोजन करण्यात आले होते. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार आहेत. प्रचारासाठी त्या मुंबईत आल्या होत्या. 18 जुलैला राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. त्यांचे आदिवासी नृत्यांनी  स्वागत करण्यात आले. त्या गोव्याहून मुंबईला आल्या. त्यांचा हा पहिलाच मुंबई दौरा होता.

राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी भाजपच्या सर्व आमदार खासदारांची भेट घेतली. यावेळी भाजपचे खासदार नितीन गडकरी’ पीयुष गोयल देखील हजर होते. देशाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणुकीला उभ्या राहिलेल्या त्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. हाॅटेल ‘लिला’मध्ये त्यांची बैठक पार पडली. पिवळया रंगाचा गमछा त्यांना भेट म्हणून देण्यात आला.आमदार संदीप धर्वे यांनी त्यांचे प्रतिकात्मक स्वागत केले.

देशभरात त्यांच्या विषयी खूप उत्सुकता होती.राज्यातील विविध भागातील आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील, नारायण राणे, केंद्रिय मंत्री भारती पवार उपस्थित होते.आज द्रौपदी मुर्मू यांची उध्दव ठाकरे भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. उध्दव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.

हे सुध्दा वाचा:

नगर परिषद निवडणुकीबाबत ओबीसी उमेदवारांना मिळाला दिलासा

गायक दलेर मेहंदीला ‘मानवी तस्करी’ प्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास

महाराष्ट्र सरकारची आणखी एक मोठी घोषणा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!