28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रकाय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले... यांना मजा मारायला निवडून...

काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले… यांना मजा मारायला निवडून दिले का? जळगावात तुफान डायलाॅगबाजी

टीम लय भारी

जळगाव : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात शिवसेनेचे ठिकठिकाणी शिवसैनिकांच्या प्रचंड उपस्थितीत मेळावे पार पडत आहेत. जळगावमध्ये सुद्धा चिंचोळी येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषण करीत असलेले संपर्क मंत्री संजय सावंत यांच्या हातातील माईक एका मद्यपी शेतकऱ्याने ओढून घेतला आणि स्वतः भाषण करीत शिंदे गटावर तुफान शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी “काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले… यांना मजा मारायला निवडून दिले का?” अशी डाॅयलाॅगबाजी करीत शेतकऱ्याने उपस्थितांची दाद मिळवली.

जळगावमधील चिंचोळी येथे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दर्शवण्यासाठी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. त्यावेळी भाषणासाठी संपर्कप्रमुख संजय सावंत उठले आणि भाषण सुरू केले तेवढ्यात उपस्थितांपैकी एका मद्यपी शेतकरी थेट उठला. भाषणावेळी सावंत यांनी बंडखोर आमदार धमकी देत असल्याचे सांगितले त्यावेळी शेतकऱ्याला जर धमकी आली, तर शेतकरी कोणाच्या बापाला घाबरत नाही असे म्हणत थेट  शेतकऱ्याने स्टेज गाठले.

दरम्यान आपल्या भावना मांडण्यासाठी मद्यपी शेतकऱ्याने चक्क संजय सावंत यांच्या हातीतील माईक घेत स्वतः बोलण्यास सुरवात केली. सावंत यांनी सुद्धा यावर आक्षेप न घेता शेतकऱ्याला आपले म्हणणे मांडू दिले. यावेळी त्या शेतकऱ्याने बंडखोर गुलाबराव पाटील आणि इतर आमदार यांना लक्ष करीत म्हटले, शेतकऱ्याच्या जीवावर निवडून येतात. निवडून आल्यावर हे करु ते करु करु, अशी मोठमोठी आश्वासने देतात मात्र प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. आमच्या गावात पूल नाही म्हणून शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे व्यथा मांडली मात्र ते नुसते भटकून राहिले, पूल झाला नाही.

पुढे शेतकरी म्हणाला, आपल्याला पहिलेच भाजपसोबत जायला पाहिजे होते हे या आमदारांना तेव्हा समजंल नाही. आता निधी दिला नाही म्हणून सांगत भुलथापा मारताहेत, अन् सर्वांची दिशाभूल करताहेत, आणि गुवाहटी फिरताहेत, मजा मारत फिरत आहेत, नागरिकांना वेडे समजता का असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकीकडे शेतकरी दुबार पेरण्या करतोय, त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, ते विमानाने गुवाहाटी काय, गोवा काय फिरुन राहिले. काय हाटील, काय झाडी म्हणत मजा मारुन राहिले. यांना मजा मारायला निवडून दिले का, असे म्हणत डाॅयलाॅगने फटकेबाजी केली आहे.

एक म्हणतो मी मुख्यमंत्री अन् दुसरा म्हणतो मी उपमुख्यमंत्री…उद्धव ठाकरेंनी तुमच्यासाठी त्याग केला.. सर्वांनी त्यांच्याशी पाठीशी राहायला पाहिजे होते, असे म्हणून बंडखोरांना त्यांनी चांगलेच सुनावले आहे. शेवटी जो फूट गया वह टूट गया… असा डायलॉग मारुन उपस्थितांच्या टाळ्या या शेतकऱ्याने मिळवल्या. हसून हसून पोट दुखवणारे या भाषणाला कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला, तर गावामध्ये सुद्धा सध्या या भाषणाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा…

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

अभिनेत्री कंगना रनौतची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसाठी खास पोस्ट

कोरोनाचे संकट पुन्हा वाढले, 24 तासांत तब्बल 60 जणांचा मृत्यू

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!