माण – खटाव हे सातारा जिल्ह्यातील दोन तालुके आहेत(Due to Devendra Fadnavis and BJP, Man – Khatav went back 20 years). ते कायम दुष्काळी तालुके म्हणून ओळखले जातात. माण – खटाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जवळ आली की, पाण्याचे राजकारण सुरू होते. विद्यमान आमदार जयकुमार गोरे हे गेली १५ वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांना पाणी प्रश्न सोडविता आलेला नाही. माण – खटावच्या वाट्याला १२.६२ टीएमसी इतके पाणी आलेले आहे. परंतु जयकुमार गोरे हे सगळे पाणी आणण्यास असमर्थ ठरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच पाणी आले असे चित्र जयकुमार गोरे यांनी रंगविले आहे.
जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं नाही | आमदार गावटग्यांना भेटतात, शेतकऱ्यांना नाही | Man Khatav
पण वस्तुस्थिती वेगळी आहे. देवेंद्र फडणवीस हे पश्चिम महाराष्ट्र व माण – खटावचे शत्रू आहेत. देवेंद्र फडणवीस व अन्य विदर्भातील नेत्यांनी साधारण २००० साली राज्यपालांची भेट घेतली होती व अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे उरमोड, जिहे कटापूर अशा योजनांमधून माण – खटावला पाणी मिळू शकले नाही. देवेंद्र फडणवीस व भाजप हेच खरे पश्चिम महाराष्ट्राचे शत्रू आहेत. यांच्यामुळेच पश्चिम महाराष्ट्र व माण – खटाव २० वर्षे मागे गेला, अशी माहिती पाण्याचे अभ्यासक बाळासाहेब पोळ यांनी दिली. बाळासाहेब पोळ यांनी जयकुमार गोरे यांच्यावरही शरसंधान केले. गेल्या १५ वर्षात माण – खटावमध्ये जे काही जन्माला आले, ते सगळे जयकुमार गोरे यांच्यामुळेच आले असल्याचा मिश्कील टोलाही पोळ यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे फाजिल लाड पुरविले