31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रJitendra Awhad Case : 'मविआ' सरकारच्या काळात पुरावे असूनही कारवाई होत नव्हती;...

Jitendra Awhad Case : ‘मविआ’ सरकारच्या काळात पुरावे असूनही कारवाई होत नव्हती; चंद्रशेखर बानकुळेंचा आरोप

जितेंद्र आव्हाड यांनी करमुसेंना बंगल्यात नेऊन मारले, त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कुठे होते असा सवाल करतानाच, तुमच्या सरकारच्या काळामध्ये तर पुरावे असूनही कारवाई केली जात नव्हती, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर आठवडाभरात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडणे आणि प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी तसेच एका कार्यक्रमात महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. आव्हाडांवरील होत असलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर षडयंत्र रचल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता. दरम्यान प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी करमुसेंना बंगल्यात नेऊन मारले, त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील कुठे होते असा सवाल करतानाच, तुमच्या सरकारच्या काळामध्ये तर पुरावे असूनही कारवाई केली जात नव्हती, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवेदनशील आहेत. त्यामुळे आरोपींवर तात्काळ कारवाया केल्या जात आहेत, गेल्या तीन महिन्यांमध्ये ज्या घटना घडल्या त्यावर देखील सरकारने तातडीने कारवाया केल्या आहेत. या सरकारच्या काळात एखादा गुन्हा घडल्यानंतर 24 तासांमध्ये आरोपींना पकडले आहे. हे काम केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे, असे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले, मुंबईत एका पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांना गरज नाही अशा लोकांना सुरक्षा देण्यात आली. मात्र त्याच सरकारने देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा काढली, इतकेच काय तर केंद्राने दिलेली सुरक्षा देखील नाकारण्यात आली होती, असा आरोप यावेळी बावनकुळे यांनी केला तसेच मविआ सरकारने त्यांच्या काळात गुन्हेगारांचे समर्थन केल्याचा आरोप देखील केला.

हे सुद्धा वाचा :

Jitendra Awhad : विनयभंगाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना अटकपूर्व जामीन मंजूर

Bharat Jodo Yatra : राज्यातील महिला मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी : जयराम रमेश

10वी 12वीच्या परिक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

सध्या अजित पवार यांचा विरोधीपक्ष नेते म्हणून बोलण्याचा अधिकार आहे. मात्र केवळ सरकारवर टीका करण्याचा ते केविलवाणा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. अजित पवार हे त्यांचे सरकार गेल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत अशी टिका देखील यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मविआ सरकारच्याकाळात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे गेल्या तीन महिन्यांमध्ये केल्याचा दावा देखील यावेळी बावनकुळे यांनी केला. मविआ सरकारच्या काळात बैठका देखील होत नव्हत्या त्यामुळे त्या लोकांनी आमच्या प्रशासनावर बोल नये असे देखील बावनकुळे यावेळी म्हणाले. मविआ सरकार असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ त्यांचा पक्ष वाढविण्याचाच प्रयत्न केला, असा आरोप देखील यावेळी चंद्र शेखर बावनकुळे यांनी केला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी