29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रदसऱ्याला झाली तब्बल 650 किलो सोन्याची खरेदी!

दसऱ्याला झाली तब्बल 650 किलो सोन्याची खरेदी!

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या दिवशी भारतीयांमध्ये सोने खरेदीची प्रथा आहे. मंगळवारी (24 ऑक्टोबर) दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर राज्यभरात किमान ६५० किलो सोन्याची विक्री झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्या उलाढालीमुळे बाजारात किमान ३५० कोटी रुपयांचा व्यवसाय झाल्याची शक्यता ज्वेलर्स असोसिएशनकडून दिली गेली. सराफ बाजारात सोन्याच्या दरात नेहमीच वाढ होत असते. तरीही दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक असते. मुंबईसह पुणे, जळगाव, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने सोने खरेदी झाली.

सोमवारी (२३ ऑक्टोबर) सोने प्रति तोळे ६१ हजार ५५० रुपये होते. ज्या दरावर तीन टक्के जीएसटी कर लागत सोने खरेदी ६३ हजार ३४५ रुपयांपर्यंत पोहोचले. चार वर्षांपूर्वी सोने प्रति तोळे ३९ हजार होते. तेच २०२३ पर्यंत ५९ हजारांच्या पुढे गेले. दसरा आणि पाडव्याला मराठी माणूस एक ग्रॅम ते पाच तोळे सोने खरेदी करतो. दिवाळीनंतर लग्न सराई लक्षात घेत बरीच कुटुंबे सोन्याची खरेदी अगोदरच करतात. गेल्या पाच वर्षात दसऱ्याला सोन्याच्या दरात किमान दोन हजारांची वाढ झालेली दिसून आली आहे. ही वाढ दसऱ्याच्या दोन आठवडे अगोदर झालेली असते. त्यामुळे यंदाही धंदा तेजीत असल्याचे ज्वेलर्स असोसिएशनचे म्हणणे आहे.

गेल्या दोन आठवड्यात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या बाजारात सतत नाविन्यपूर्ण मॉडेल्स दाखल होत आहेत. मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशीन,ओवन, एलईडी या वस्तूंची सत्य बाजारात प्रचंड मागणी आहे. दिवाळीपर्यंत या वस्तूंचा धंदा तेजीत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा 

ऐन निवडणुकीत ‘संघा’वर वेब सीरिज

जाणून घ्या विजयादशमीचे महत्त्व!

आई-वडिलांसाठी ‘तो’ बनला पोलिस

वाहनांची नोंदणी दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात केली जाते. वर्षभर होणाऱ्या वाहनांच्या विक्री पैकी ३० टक्के वाहनांची विक्री दसऱ्याला होते. मुंबईतील ताडदेव, वडाळा,अंधेरी आणि बोरवली या चार आरटीओमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत १७ हजार ६३८ वाहनांची नोंदणी झाली आहे . यात दूचाकिंची किती संख्या जास्त आहे तर सर्वाधिक नोंदणी मुंबईतील ताडदेव आरटीओ मध्ये झाली आहे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी