30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रBacchu Kadu : आमदार बच्चु कडूंची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरूच; मतदार...

Bacchu Kadu : आमदार बच्चु कडूंची नाराजी दुर करण्याचे प्रयत्न सुरूच; मतदार संघाला 500 कोटींचा निधी देणार

आमदार बच्चु कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी दिला जाणार आहे. या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर आली आहे.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चु कडू यांच्यावर गुवाहाटीला जावून पैसे घेतल्याचा आरोप केल्याने आमदार बच्चु कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात मोठा वाद उफळला होता. हा वाद मिटविण्यासाठी अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालावे लागले. त्यानंतर रवी राणा यांनी शब्द मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र बच्चु कडू हे अद्यापही नाराज असल्याचे दिसत आहे. बच्चु कडू यांनी अमरावतीमध्ये काल मेळावा घेत कार्यकर्त्यांसमोर तुफान भाषण करत सत्ता गेली चुलीत असे म्हटले होते. त्यामुळे बच्चु कडू यांची नाराजी संपलेली नसल्याचे दिसून आले.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात जवळपास 50 आमदार सामील झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे-भाजपचे सरकार राज्यात आले. महाविकास आघाडीत मंत्रीपदी असलेले अचलपूरचे आमदार बच्चु कडू यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला होता. दरम्यान, आमदार बच्चु कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी दिला जाणार आहे. या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या समोर आली आहे.
हे सुद्धा वाचा :

Elon Musk : ट्विटरवर हेट कंटेंटेमध्ये वाढ; बड्या अधिकाऱ्यांमध्ये राजीनाम्यांचा धडाका सुरूच

Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणात कोर्टाची ‘तारीख पे तारीख’ सुरूच! संजय राऊतांची कोठडी वाढली

Tomato Prices : ‘टोमॅटो’ने शेतकऱ्यांना रडवलं; दर कमालीचे कोसळले

आमदार बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा अमरावतीमध्ये मेळावा झाला, विषेश म्हणजे रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशीच आमदार बच्चु कडू यांनी कार्यकर्त्यांचा हा विराट मेळावा अमरावतीत घेतला होता. आमदार रवी राणा यांनी केलेल्या आरोपांबाबत त्यांनी या मेळाव्यात खरपूस समाचार घेतला. या मेळाव्यात आमदार राजकुमार पटेल यांनी तर थेट अमरावतीचा खासदार आता प्रहारच ठरवेल असे देखील जाहीर केले. त्यामुळे आमदार बच्चु कडू यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार बच्चु कडू यांच्या मतदार संघासाठी 500 कोटींचा निधी दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी