27 C
Mumbai
Monday, March 20, 2023
घरमहाराष्ट्रमोदींच्या नेतृत्वात, देशाच्या इतिहासात प्रथमच कट्टर मुस्लिम नेता प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणा!

मोदींच्या नेतृत्वात, देशाच्या इतिहासात प्रथमच कट्टर मुस्लिम नेता प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणा!

भारत उद्या गुरुवारी आपला ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यंदा प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सीसी (Abdel Fateh al-Sisi)उपस्थित राहणार आहेत. इजिप्तच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान पहिल्यांदाच मिळत आहे. २०२१ साली ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. सध्या इजिप्तची अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक बनली असून तो देश आर्थिक संकटातून जात आहे. पण कोणत्याही अरब देशाने इजिप्तपुढे मदतीचा हा पुढे केलेला नाही. भारताने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लादले असतानाही इजिप्तला कित्येक टन गहू निर्यात केला. या पार्श्वभूमीवर अब्देल फतेह अल-सीसी हे भारत भेटीवर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अब्देल फतेह अल-सीसी यांच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. मोदींच्या नेतृत्वात, देशात इतिहासात प्रथमच कट्टर मुस्लिम नेता प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अब्देल फतेह अल-सीसी यांना इजिप्तचे अत्यंत प्रभावशाली नेते मानले जाते. देशात राजकीय स्थिरता प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जुलै २०१३ मध्ये राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांना पदच्चुत करण्यात आले. त्यानांतर एक वर्षांनी ते स्वतः राष्ट्रपती बनले. राष्ट्रपती पदाची धुरा सांभाळण्यापूर्वी अब्देल फतेह अल-सीसी हे सैन्यदलाचे प्रमुख होते. त्यांचा जन्म १९५४ साली काहिरा येथील गमलेया या ठिकाणी झाला. ब्रिटनमधील स्टाफ कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. आणि २००५ साली पेन्सिल्व्हानियातील सैनिकी महाविद्यालयातून पदवी परंपर केली.

हे सुद्धा वाचा

सरकारला समविचारी बगलबच्च्यांना न्यायव्यवस्थेत घुसवायचेय; मदन बी. लोकूर यांची घणाघाती टीका

Narendra Modi: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमच्या हस्तकांकडून मोदींच्या हत्येचा कट ?; मुंबई पोलिसांना ऑडिओ मेसेज

‘पठाण’ला देशविदेशातून तूफान प्रतिसाद; शाहरुखच्या चाहत्यांनी थिएटर्स डोक्यावर घेतली

 

महाराष्ट्राचा दिल्लीत स्त्रीशक्ती जागर

Image
कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणारे संचलन हा सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे. महाराष्ट्राने नेहमीच विविधांगी विषयांवरील चित्ररथ सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहेत. यंदा ‘साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता असते. चित्ररथाच्या समोरील बाजूला गोंधळी संबळ वाजवताना दिसत आहेत. त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा उभारण्यात आला आहे. मध्यभागी पोतराज दाखवण्यात आला आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी