30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Khadse : बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटी म्हणजे प्रेयसीच्या आठवणीप्रमाणे : एकनाथ खडसे

Eknath Khadse : बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटी म्हणजे प्रेयसीच्या आठवणीप्रमाणे : एकनाथ खडसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच आपल्या समर्थक आमदारांसोबत पुन्हा एकदा लवकरच गुवाहाटीला रवाना होणार आहेत. ते यावेळी कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुवाहाटी दौऱ्यावरून शिंदे गटाला चिमटे काढले आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. या वृत्ताला काही दिवसांपूर्वी खुद्द मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला होता. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर बोचरी टीका केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात एकनाथ खडसे म्हणाले की, ‘शिंदे गटातील बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटी म्हणजे प्रेयसीच्या आठवणीप्रमाणे आहे.’ एकनाथ खडसेंनी गुवाहाटीला जाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या (एकनाथ शिंदे गटाच्या) आमदारांची टिंगल उडवली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, मी सुद्धा दर तीन ते चार वर्षांनी गुवाहाटीला कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी जातो. यावेळीही मी दर्शनाला जाणार आहे. राज्यात पुन्हा आमचे सरकार व्हावे, असं साकडं मी देवीला घालणार असल्याचेही खडसे यांनी म्हंटले आहे.

40 बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी असल्याचा चिमटा एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाच्या वेळी काढला. मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. पुन्हा तेच हॉटेल, तीच झाडी, तीच डोंगर असे म्हणत खडसेंनी शिंदे गटाला टोला देखील लगावला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छठ पूजेच्या कार्यक्रमादरम्यान येत्या काही दिवसांत पुन्हा गुवाहाटीला भेट देणार असल्याचे सांगितले होते. यावेळी सर्व समर्थक आमदारही त्यांच्यासोबत असतील. शिंदे यांनी आपल्या समराठक आमदारांसहित कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले होते. एवढेच नाही तर लवकरच रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

Mantralay News : हेमराज बागुल यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी नियुक्ती

Bhima Koregaon Case : आनंद तेलतूंबडे यांना जामीन मंजूर; पण काही दिवस तुरूंगातच रहावे लागणार

Mahavikas Aghadi : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता

एकनाथ शिंदे यांचे गुवाहाटी कनेक्शन
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या स्थापनेत गुवाहाटीचे विशेष महत्व आहे. उद्धव ठाकरेंविरोधात बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या सर्व समर्थक आमदारांसह आधी सुरतला गेले आणि त्यानंतर विमानाने गुवाहाटीला पोहोचले. गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत बराच काळ थांबले. याचठिकाणी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडून शिंदे-फडणवीस सरकार कसे स्थापन करायचे ? याचा मास्टर प्लॅन आखला गेला. यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात सुरू झालेले राजकीय युद्ध निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचले.

दरम्यान, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. गुवाहाटी येथे वास्तव्याला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. सुरक्षेच्या कारणास्तव शिंदे गटाच्या आमदारांना त्यावेळी कामाख्या मातेचे दर्शन घेता आले नाही. परंतु आता लवकरच मुख्यतामंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसोबत देवीचे दर्शन घेणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी