32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे गटाने कशीबशी जिंकली कोथळी ग्रामपंचायत

एकनाथ खडसे गटाने कशीबशी जिंकली कोथळी ग्रामपंचायत

टीम लय भारी

जळगाव:जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या गटाला काठावर विजय मिळाला आहे. एकूण ११ पैकी ६ जागांवर खडसे समर्थकांनी बाजी मारली. तर उर्वरित ५ जागांवर खडसेंचे पारंपरिक राजकीय विरोधक शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थक निवडून आले आहेत. (Eknath Khadse supporters bags Kothali Gram Panchayat)

कोथळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ११ जागांपैकी १ जागा बिनविरोध निवडून आली होती. त्यानंतर १० जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. एकनाथ खडसे यांचे राजकीय विरोधक असलेले शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत आहे. परंतु, कोथळीत मात्र, लढत वेगळी होती. या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. एकनाथ खडसे यांच्या सून भाजप खासदार रक्षा खडसे यांचेही समर्थक रिंगणात असल्याने राष्ट्रवादी व भाजप हे एकत्र होते. त्यात खडसे गटाच्या पारड्यात ६ तर शिवसेना पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या पारड्यात ५ जागा गेल्या. अवघ्या एका जागेचे बहुमत खडसे गटाकडे आहे.

राखी गणेश राणे, नारायण नामदेव चौधरी, उमेश सुभाष राणे, अनुराधा योगेश चौधरी, मीराबाई श्यामराव पाटील आणि बिनविरोध निवडून आलेल्या वंदना विजय चौधरी

योगेश निनू राणे, पंकज अशोक राणे, मोहन रमेश कोळी, ताराबाई प्रल्हाद भिल्ल, शीतल संदीप विटकरे

शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत खडसे गटाच्या विरोधात नवपरिवर्तन पॅनल रिंगणात उभे केले होते. त्यात आमच्या वाट्याला ५ जागा आल्या. आम्हाला जनमताचा कौल मान्य आहे, अशी प्रतिक्रिया नवपरिवर्तन पॅनलचे उमेदवार योगेश राणे यांनी दिली आहे.

कोथळी ग्रामपंचायतीत ६ जागा खडसे समर्थकांच्या निवडून आल्या आहेत. यात ते कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा ते खडसे समर्थक आहेत, हे महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया खडसेंच्या कन्या ॲड. रोहिणी खडसेंनी दिली.

कोथळीत नाथाभाऊंना मानणारे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे हा नाथाभाऊंच्या विचारांचा विजय आहे, असे म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी