गुगल सर्च इंजिन म्हणजे माहितीचा खजिनाच म्हणून पाहिले जाते. तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नसली की थेट गुगल सर्चचा पर्याय उपलब्ध असतो. मग ती गोष्ट एखाद्या रेसिपीपासून ते अगदी तुमच्या जवळपास एखादे वस्तू कुठे मिळेल… इथंपासून ते अगदी एखादे सरकारी कागदपत्र जरी काढायचे असेल तरी लोक आता गुगलचा सहज वापर करतात. एखाद्या व्यक्तीबाबत माहिती घेण्यासाठी देखील गुगलचा लोक मोठ्याप्रमाणात वापर करत आहेत. तर पाहूयात यंदा गुगलवर कोणत्या व्यक्तीविषयी सर्वाधिक जास्त सर्च केला आहे.
सन 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या 10 व्यक्ती
1) नुपूर शर्मा
नुपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या होत्या एका न्यूज चॅनलवर डीबेटमध्ये बोलताना त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर जगभरातून नुपुर शर्मा यांच्यावर टीका झाली. या वादग्रस्त वक्तव्यानंतर नुपुर शर्मा यांच्याबाबत माहिती घेण्यासाठी भारतीयांनी गुगलवर त्यांची माहिती सर्वाधिक सर्च केली.
2) दौपदी मुर्मु
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याबाबत भारतीयांनी मोठ्याप्रमाणात माहिती सर्च केलेली आहे. गुगलवर सर्च केलेल्या पहिल्या दहा व्यक्तींमध्ये राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. यंदा राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने दौपदी मुर्मु यांच्या नावाची घोषणा केली होती. तर त्यांच्या विरोधात यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत दौपदी मुर्मु यांचा विजय होऊन त्या भारताच्या राष्ट्रपती झाल्या.
3) ऋषी सुनक
ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचे नाव या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती आणि सुधा मुर्ती यांचे ऋषी सुनक हे जावई आहेत. ब्रिटनच्या राजकारणात सुनक यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्यानंतर भारतीयांनी त्यांची माहिती देखील गुगलवर मोठ्याप्रमाणात सर्च केली.
4) ललित मोदी
इंडियन प्रमियर लिगचे माजी अध्यक्ष, बीसीसीआयचे माजी उपाध्यक्ष ललित मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बीसीसीआयने त्यांचे निलंबन केले होते. इडी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच ललित मोदी ब्रिटनला पळून गेले. मात्र अभिनेत्री सुश्मिता सेनसोबतच्या नात्याच्या चर्चेनंतर त्यांचे नाव देखील गुललवर मोठ्याप्रमाणात भारतीयांनी सर्च केले. गुगलच्या या यादीत ललित मोदी चौथ्या स्थानावर आहेत.
5) सुश्मिता सेन
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचे नाव देखील ललित मोदींच्या खालोखाल पाचव्या स्थानावर आहे. ललित मोदींच्या रिलेशनशिपमध्ये सुश्मिता सेन आल्यानंतर त्यांचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले. सुश्मिता सेनच्या या नव्या नात्याच्या उत्सुकतेमुळे भारतीयांनी सुश्मिता सेनचे नाव देखील मोठ्याप्रमाणात सर्च केले.
6) अंजली अरोरा
कच्चा बदाम फेम टिक टॉक स्टार आणि मॉ़डेल अंजली अरोरा सोशल मीडियावर खुपच अॅक्टिव्ह असते. अंजली अरोराचे असंख्य चाहते इंस्टाग्रामवर तीला फॉलो करतात. इंस्टाग्रामवर अंजली अरोराचे तब्बल 12.2 मिलियन्स फॉलोअर्स आहेत. अंजली अरोराचा कच्चा बदाम या गाण्यावरचा व्हिडीओ तब्बल तीन कोटी लोकांनी पाहिला होता. यंदाच्या व्यक्तींच्या गुलल सर्च यादीत अंजली अरोराचे नाव सहाव्या क्रमांकावर आहे.
7) अब्दु रोजिक
तजाकिस्तानचा अब्दु रोजिक हा 19 वर्षीय गायक जगातील सर्वात कमी उंचीचा गायक आहे.
अब्दु रोजिकच्या गाण्यांना भारतासह जगभरात मोठ्याप्रमाणात पसंती मिळाली. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा चाहतावर्ग आहे. कमी उंची असली तरी आजारावर मात करत आपल्या आवाजाने त्याने जगाला भुरळ घातली आहे. अब्दु रोजिक यांचे नाव देखील भारतीयांनी मोठ्या प्रमाणात सर्च केले असून भारतीयांनी सर्च केलेल्या यादीत अब्दु रोजिक सातव्या स्थानावर आहे.
8) एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देखील भारतीयांनी मोठ्याप्रमाणात सर्च केले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार 12 खासदार फोडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार देखील पाडले. सत्तासंघर्षाच्या काळात एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीला एका हॉटेलात मुक्कामी राहिले. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत त्यांनी राज्यात सत्तास्थापन केली आणि मुख्यमंत्री झाले. भारतीयांनी एकनाथ शिंदे यांचे नाव देखील मोठ्याप्रमाणात सर्च केले असून गुगलच्या यादीत ते आठव्या स्थानावर आहेत.
हे सुद्धा वाचा
VIDEO : संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदार आक्रमक
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बाजरीची भाकरी हा उत्तम पर्याय
PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर….
9) प्रविण तांबे
प्रविण तांबे या मराठमोळा क्रिकेटरचे नाव कोण विसरेल? वयाच्या 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करुन त्याने त्याच्या खेळाचा जलवा दाखविला होता. मुंबईत जन्मलेला प्रविण तांबे यांची क्रिकेटर बणण्याचे स्वप्न होते. टीम इंडियामध्ये येण्यासाठी अटोकाट प्रयत्न करुन देखील त्याला यश मिळाले नव्हते. पण आयपीएलमध्ये संधी मिळाल्यानंतर त्याने त्याच्या खेळाची ताकद दाखवून दिली. प्रविण तांबे याच्या आयुष्यावर चित्रपट देखील आला.
10) एम्बर हर्ड
हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची विभक्त पत्नी अभिनेत्री एम्बर हर्ड यांच्या खटल्याची यंदा जगभरात चर्चा झाली. या खटल्याचा निकाल ज़ॉनी डेपच्या बाजूने लागला. या काळात भारतीयांनी अभिनेत्री एम्बर हर्डचे नाव देखील मोठ्या प्रमाणात सर्च केले. गुगलने 2022 मध्ये सर्च केलेल्या व्यक्तींच्या यादीत एम्बर हर्डचे नाव दहाव्या स्थानावर आहे.