29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राने 35 हजार कोटींची केलेली गुंतवणूक कौतुकास्पद !

एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राने 35 हजार कोटींची केलेली गुंतवणूक कौतुकास्पद !

महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देश विदेशातील अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आले. यांपैकी हिंदुजा समूहाने विविध 11 क्षेत्रांमध्ये सुमारे 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचा करार राज्य शासनासोबत केला आहे.

महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत देश विदेशातील अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आले. यांपैकी हिंदुजा समूहाने विविध 11 क्षेत्रांमध्ये सुमारे 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचा करार राज्य शासनासोबत केला आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करून त्याचे आदानप्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हिंदुजा ग्रुपचे जी.पी. हिंदुजा, प्रकाश हिंदुजा, माजी कॅप्टन अभिजित अडसूळ, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे उपस्थित होते. यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील भुमिपुत्र म्हणून हिंदुजा समूहाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हटले.

‘गेल्या दोन दिवसांपूर्वी शासनाने 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. त्यातून 55 हजारांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार मिळेल. सरकारी विभागांमध्ये 75 हजार नोकऱ्या आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, मात्र खाजगी क्षेत्रातही आता या गुंतवणुकीमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील, तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या जीवनात परिवर्तन येईल’, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. नुकताच लोकार्पित झालेला नागपूर-मुंबई दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा फक्त रस्ता नाही तर तो एक ‘गेमचेंजर प्रोजेक्ट’ असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

संभाजी महाराजांना दुर्लक्षित करणाऱ्या ‘कालनिर्णय’ला उशिराने सुचले शहाणपण !

भारत-पाकिस्तान सामन्याने आमचं आयुष्य बदलून टाकलं; मोहम्मद रिजवानने सांगितली आठवण

थंडीच्या वातावरणातही गाल गुलाबी ठेवण्याचे रहस्य जाणून घ्या एका क्लिकवर

हिंदुजा समूहाने केली 35 हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी निर्माण करतानाच राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी हिंदुजा समूहाने राज्यात 35 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केला आहे. नवीकरणीय ऊर्जा, माध्यमे आणि मनोरंजन, ग्रामीण आर्थिक विकास, सायबर सुरक्षा, व्यावसायिक ऑटोमोबाईल्स, बॅंकिंग- फायनान्स, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, उत्पादन आणि नव तंत्रज्ञान या 11 क्षेत्रात हा उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे.

अतिशय कमी वेळेत हा सामंजस्य करार आज असल्याबद्दल हिंदुजा समूहाचे जी. पी. हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले. मी असून 1914 पासून महाराष्ट्रात राहतो, राज्याच्या प्रगतीसाठी, समाजसेवेसाठी शिक्षण, आरोग्य, निर्मिती उद्योग, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात काम करून, अमेरिका, इंग्लंड येथील उद्योजक मित्रांना देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीसाठी आणणार असल्याचे सांगून अतिशय कमी वेळेत विविध निर्णय घेऊन सरकार गतीने काम करीत असल्याबद्दल हिंदुजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी