31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमहाराष्ट्रEknath Shinde Cabinet Expansion : राम शिंदे, गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद नाही; धनगर...

Eknath Shinde Cabinet Expansion : राम शिंदे, गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद नाही; धनगर समाजामध्ये संताप

पहिल्याच टप्प्यात जवळपास ३० जणांना मंत्रीपदे दिली जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात नाकारलेल्या शिंदे व पडळकर यांना भविष्यात लवकर मंत्रीपद मिळणे जवळपास दुरापास्त आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मंत्रीमंडळाचा विस्तार करण्याचा मुहूर्त मिळाला आहे. तब्बल ३० जणांना मंगळवारी मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. एवढ्या मोठ्या मंत्रीमंडळामध्ये धनगर समाजाला मात्र स्थान दिलेले नाही. भारतीय जनता पक्षाने ‘धनगर’ समाजाच्या व्होट बँकेवर वारंवार मालकी हक्क गाजविण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही धनगर समाजातील एका सुद्धा चेहऱ्याला मंत्रीमंडळात स्थान दिले नसल्याने धनगर समाजातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. धनगर समाजातील कार्यकर्ते सोशल मीडियातून आपली नाराजी व्यक्त करू लागले आहेत. राम शिंदे व गोपीचंद पडळकर हे दोन मातब्बर नेते भाजपमध्ये आहेत. मग दोघांनाही का संधी दिली नाही, असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना मंत्रीमंडळात स्थान नाही

Eknath Shinde Cabinet Expansion : तब्बल ३० जण मंत्रीपदाची घेणार शपथ !

Maharashtra Cabinet : एकनाथ शिंदेच्या मंत्रीमंडळात महिलेचा नवा चेहरा

पहिल्याच टप्प्यात जवळपास ३० जणांना मंत्रीपदे दिली जाणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार लवकर होण्याची शक्यता नाही. परिणामी पहिल्या टप्प्यात नाकारलेल्या शिंदे व पडळकर यांना भविष्यात लवकर मंत्रीपद मिळणे जवळपास दुरापास्त आहे.

देवेंद्र फडणवीस हे नेहमीच धनगर समाजाला फसवतात. ‘भाजपचे सरकार सत्तेत आले तर, पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करू’ अशी धादांत भूलथाप फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच वर्षांचा कालावधी यशस्वीपणे पार पाडला. पण धनगर समाजाला त्यांनी आरक्षण दिलेच नाही. महादेव जानकर यांनाही वापरून नंतर फेकून दिले. विधानसभा निवडणुकीत तर फडणवीस यांनी महादेव जानकर यांच्या राहूल कुल या आमदारालाही पळवून नेले.

कर्जत – जामखेड हा राम शिंदे यांचा मतदारसंघ आहे. शिंदे यांनी तो मजबुतीने बांधला होता. पण शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार यांनी निवडणूक लढविली. पुण्यात चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस मदत करेल, त्या बदल्यात भाजप रोहित पवार यांना कर्जत – जामखेडमध्ये मदत करेल, अशी छुपी युती झाली होती. एवढेच नव्हे तर भाजपचे खासदार असलेल्या डॉ. सुजय विखे – पाटील यांनी सुद्धा मैत्रीसंबंध जपून रोहित पवार यांना मदत केली होती, व राम शिंदे यांच्याविरोधात काम केले होते.

सात वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात राम शिंदे व महादेव जानकर या दोघांना मंत्रीपदे दिली होती. यावेळी सुद्धा किमान शिंदे व पडळकर यांना मंत्रीपदे दिली जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दोघांपैकी एकाला तरी निश्चित मंत्रीपद दिले जाईल, असा विश्वास धनगर समाजातील जाणत्या कार्यकर्त्यांना वाटत होता. दोघांनाही संधी दिली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी