33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे यांनी स्थापन केली अध्यात्मिक संघटना; दुष्काळी भागातील महाराजांकडे दिली जबाबदारी

एकनाथ शिंदे यांनी स्थापन केली अध्यात्मिक संघटना; दुष्काळी भागातील महाराजांकडे दिली जबाबदारी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेतून बाहेर पडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी आता संघटन बांधणी आणि मजबूतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील पाठबळ मिळविण्यासाठी आता त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना केली आहे. या अध्यात्मिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माण खटाव या दुष्काळीभागातील संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायातील युवकांचे मार्गदर्शक ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी वर्षा बंगल्यावर अक्षय महाराज भोसले यांना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी मंत्री दादासाहेब भुसे, खासदार राहुल शेवाळे, पक्षाचे सचिव संजय मोरे, नरेश म्हस्के पक्ष प्रवक्त्या शीतल म्हात्रे व पक्षातील ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. अक्षय महाराज भोसले हे वारकरी संत साहित्याचे अभ्यासातून समाज प्रबोधनपर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, व्यसनमुक्तीसाठी कार्य, स्त्री सक्षमासाठी कार्य करत आहेत.

हे सुद्धा वाचा
महामोर्चात राज्यपाल रावणाच्या रूपात!

IPS अधिकाऱ्याची कौतुकास्पद कामगिरी, लेकीचा विवाह सोहळा बाजूला ठेवला, अन् बिकट प्रसंगात कर्तव्यावर हजर राहिला

यशवंतराव होळकरांचे कर्तृत्व शालेय अभ्यासक्रमात सामाविष्ठ करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना अभिप्रेत असणारा हिंदुत्वाचा विचार यातून महाराष्ट्रभर पेरण्याचे कार्य धर्मवीर आध्यात्मिक सेना करणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना पक्षावर देखील हक्क सांगितल्यामुळे पक्षात आता दोन गट निर्मान झाले आहेत. पक्षाचा वाद सध्या सुनवाणीसाठी प्रलंबित असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळाले आहे. शिंदे यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी निवडणे, पक्षाचा विस्तार करणे अशा कामांचा झपाटा लावला असून वेगवेगळ्या क्षेत्रात देखील संघटना निर्मितीकडे आता लक्ष वेधले आहे.

एकनाथ शिंदे यांनी संघटनवाढीसाठी आता धर्मवीर आध्यात्मिक सेना स्थापन केली असून आध्यात्मिक क्षेत्रातून ग्रामीण भागापर्यंतचे लोक जोडण्याचे काम सुरू केले आहे. या संघटनेव्दारे आता आध्यात्मिक क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्याबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातील पाठबळ देखील मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी