30 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रडोंगराच्या कपारीत गाव वसलेले, सायकल देखील जावू शकत नाही; एकनाथ शिंदे यांनी...

डोंगराच्या कपारीत गाव वसलेले, सायकल देखील जावू शकत नाही; एकनाथ शिंदे यांनी सांगितला इर्शाळवाडीच्या काळरात्रीचा अनुभव!

इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला असून 8 लोक जखमी झाल्याची माहिती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. दुर्घटना झाल्याचे समजताच सरकारी यंत्रणा तातडीने कामाला लागली मात्र ते ठिकाणच इतके दुर्गम होते की, मशिनरी तेथे पोहचू शकत नव्हती. मणूष्यबळ वापरूनच तेथे बचावकार्य करावे लागत असल्याचे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. रात्री ११.३५ ला इर्शाळवाडी दुर्घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरु केले. अतिशय दुर्गम भाग, पाऊस अशा परिस्थितीत १२.४० च्या सुमारास यंत्रणा पोहचली. मी देखील सातत्त्याने त्यांच्या संपर्कात होतो. उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादा देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. या घटनेची माहिती मिळतात मी प्रशासनाच्या संपर्कात होतो. प्रांत, तहसिलदार दोन तासात पोहचले. पहाटे तीनला गिरीष महाजन महेश बालदी तेथे पोहचले होते. मी पहाटे घटनास्थळी गेलो. खरेतर दुर्घटनास्थळ अशा दुर्गम ठिकाणी होते की, तिकडे सायकल देखील जावू शकत नाही अशी परिस्थिती होती. उंच डोंगर आणि डोंगराच्या कपारीत गाव वसले होते. मंत्री उदय सांमत अनिल पाटील आदिती तटकरे, दादा भुसे पोहचले. प्रशांत ठाकुर पोहचले.

दुर्घटना घडल्यानंतर सकाळी मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणे महत्त्वाची कामगिरी करणे गरजेचे होते. या ठिकाणी ५० ते १०० वर्षांपासून ते लोक तेथे होते. दरडप्रवण क्षेत्राच्या यादीत देखील त्यांचे नाव नव्हते. एका बाजूने डोंगर कोसळला. ४८ गावे त्या गावात आहेत,अख्खा डोंगर या सर्व घरांवर पडल्याची सुरुवातीला माहिती मिळाली, मात्र १७ १८ घरांवर एक कडा कोसळला होता, असे शिंदे म्हणाले. दुर्घटनास्थळी मणूष्यबळाशिवाय बचावकार्य करण्याचा दुसरा पर्याय नव्हता म्हणून आपण जास्तीजास्त एनडीआरएफचे जवान मागविले. त्याचबरोबर अनेक संस्थांचा बचावकार्याला सहभाग मिळाला असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

अमित शाह यांनी दोन हेलिकॉप्टरची व्यवस्था केली

एकनाथ शिंदे म्हणाले, दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा फोन आला. ते म्हणाले आमच्याकडून काही मदतीची आवश्यकता असेल तर सांगा त्यांनी दोन हेलिकॉप्टर देखील तैनात ठेवली होती. त्यातून आम्ही विचार केला की दोन छोट्या मशिन आपण सोडू शकतो का खाली. तो प्रयत्न केला मात्र हवामान खराब होते. त्यामुळे तो प्रयत्न केला त्यात यश आले नाही. आतापर्यंत २० लोक गेले आठ लोक जखमी झाले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.
अतिशय विदारक दृष्य होते.

घटनास्थळी गेल्यानंतर जे मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना भेटलो. मंत्री महाजन आणि महेश बालदी सातत्याने स्पॉटवर होते. नातेवाईकांचा आक्रोश मृतदेहांची विल्हेवाट लावणे जिकीरीचे काम होते. मृतांच्या नातेवाईकांशी बोलून वरतीच अंत्यविधीचे ठरले पण हे सगळे अतिशय विदारक दृष्य होते. मात्र सर्वांनी माणूसकी दाखवली. लोकांनी मदत केली. खाण्यापिण्याची व्यवस्था केली. मृतांच्या परिवाराची व्यवस्था केली. मृताच्या नातेवाईकांना सरकारच्या मदत केली. एनडीआरएफची मोठी मदत झाली. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत केली. जखमींवर उपचाराचा खर्च करत आहोत. आपल्याकडे यंत्रणा होती पण हवामानामुळे वापरता येत नव्हती. आज सकाळपासून बचावकार्य करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

आपण गेल्यामुळे यंत्रणा हलते, सतर्क होते
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, दुर्घटना घडल्याचे कळताच गिरीष महाजन, महेश बालदी रात्रीच पोहचले त्यांचे कौतूक करायला पाहिजे. मी पहाटे गेलो मी देखील रात्रभर त्यांच्या सर्वांच्या संपर्कात होतो. आपण गेल्यामुळे यंत्रणा हलते, सतर्क होते. नाना पटोले मला रस्त्यात भेटले. नाना ना मी सांगितले. फार चढ आहे. आपल्याला ईच्छा असली तरी. मी वर चढायला सुरुवात केली. पण एका स्टेजवर मला थोडेसे अवघड वाटले. मला वरुन फोन करत होते. एवढ्या उंचावर ठिकाण होते. फार भयानक परिस्थिती होती. एका स्टेजवर गेल्यानंतर मला वाटले जे एवढे साहित्य घेऊन जात आहेत त्यांना सॅल्यूट केला पाहिजे. कारण परिस्थिती कठीण आणि बाका होता. एक अग्नीमन दलाचा जवान मृत्यू झाला त्याच्या परिवाराच्या पाठिशी आहोत.

हे सुद्धा वाचा 

मणिपूर महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेसचा सभात्याग

मुंबईत मुसळधार पावसाचा हार्बर मार्गावरील लोकल सेवेला फटका

मणिपूरमध्ये नग्न धिंड काढलेल्या महिलांमधील एक महिला कारगिलमध्ये लढलेल्या माजी सैनिकाची पत्नी

एकनाथ शिंदे म्हणाले, दुर्घटनास्थळ दुर्गम ठिकाणी असल्याने यंत्रणा असून वापरु शकलो नाही हि खंत आहे. आज पून्हा बचावकार्य सुरु आहे. इतर दुर्घटनांमध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी देखील जिंवत माणसे निघाली आहेत असा अनुभव आहे. एनडीआरएफ, रेस्क्यू टीमचे कार्य म्हणजे खरोखर वाखानण्यासारखे आहे. जीव धोक्यात घालून ते काम करत असल्याचे पाहिले. ज्यांना माहिती मिळाली ते तेथे पोहचले. अंबादास दानवे तसेच काही लोक येऊन गेले. दुर्घटनेतील आपादग्रस्तांची व्यवस्था तातडीने शाळेत केली असून ५० ते ६० कंटेनर मागवले आहेत. तेथे तीस कंटेनर पोहचले देखील आहेत. या कंटेनरमध्ये ३० कुटुंबांची सोय केली आहे. जोपर्यंत त्यांचे पूनर्वसन होत नाही तोपर्यंत शाळेमध्ये एकत्र शक्य होत नाही, त्यामुळे कंटेनरची व्यवस्था करत आहोत.

इर्शाळवाडीचे पूनर्वसन सिडको करणार
एकनाथ शिंदे म्हणाले इर्शाळवाडीच्या पूनर्वसनासाठी एक जागा पाहिली असून सिडकोला आता तात्काळ घरे बांधण्यासाठी सांगितले आहे. आज कॅबिनेटमध्ये अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दरडप्रवण क्षेत्रातील लोकांना ज्या ठिकाणी धोकाआहे त्यांना सुरक्षित ठिकाणी कायमस्वरुपी पूनर्वसन करणार आहोत. रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी राज्यातील दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे पूनर्वसन करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. १०९ लोकांची ओळख पटली आहे. इतर लोकांचा शोध सुरु आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी