28 C
Mumbai
Saturday, September 16, 2023
घरमहाराष्ट्रMaharashtra Monsoon Session 2022 : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले झाले आक्रमक

Maharashtra Monsoon Session 2022 : शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले झाले आक्रमक

विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आमदारांकडून धक्काबुक्की करून एकमेकांवर हात उचलण्यात आले. ज्यामुळे काही वेळेसाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पण यावेळी शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले हे अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यामध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच आमदारांकडून धक्काबुक्की करून एकमेकांवर हात उचलण्यात आले. ज्यामुळे काही वेळेसाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पण यावेळी शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले हे अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भरतशेठ गोगावले यांनी यावेळी विरोधकांना धमकीवजा सूचना देत आव्हान देखील दिले. अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा भरतशेठ गोगावले यांच्याकडून यावेळी विरोधकांना देण्यात आला. तसेच यावेळी भरत गोगावले यांनी ते काय आम्हाला धक्काबुक्की करतील, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली, असे कबुल सुद्धा केले.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आमदारांनी विरोधकांविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी विरोधकांमधील भ्रष्टाचाराबाबत घोषणा केल्या. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील पोस्टर देखील झळकावले. पण यावेळी त्याठिकाणी आलेल्या विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. ज्यामुळे याठिकाणी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात धक्काबुक्की झाली.

यानंतर एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले प्रसार माध्यमांशी बोलताना आक्रमक झाले. आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असे यावेळी भरतशेठ गोगावले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Monsoon Session 2022 : आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांना बनवला ‘कुस्तीचा आखाडा’

‘Eknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला ‘एकनाथ खडसे’ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले ‘खडसावले’

Supriya Sule : सत्ताधाऱ्यांचे वर्तन महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये. आमच्या मार्गात कोणी आलं तर आम्ही सोडणार नाही, असेही ते म्हणाले. तुम्हाला त्यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली, असे पत्रकारांकडून भरतशेठ गोगावले यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी अरे हाड… त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरपोक नाहीत. हा तर ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे, असेही यावेळी भरतशेठ गोगावले यांच्याकडून प्रसार माध्यमांशी बोलताना सांगण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी