31 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरमहाराष्ट्रEknath Shinde : एकनाथ शिंदे रुग्णालयात शरद पवारांना भेटले; वाचा काय झाली...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रुग्णालयात शरद पवारांना भेटले; वाचा काय झाली चर्चा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. शिंदे यांनी पवारांच्या तब्बेतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून देखील त्यांच्या तब्बेतीची माहिती घेतली, अशी माहिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

दरम्यान राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ हे शिबिर अहमदनगरमधील शिर्डी येथे सुरू आहे. या शिबिरासाठी आज राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिराला शरद पवार उपस्थित राहणार का अशी चर्चा सुरू होती, मात्र शिंदे यांनी याबाबतची माहिती माध्यमांसमोर देत शरद पवार हे उद्या मेळाव्यासाठी शिर्डीला जाणार असल्याचे सांगितले. तसेच शिर्डीवरून पुन्हा ते रुग्णालयात येणार असून काही वैद्यकीय चाचण्या करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.
हे सुद्धा वाचा :

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर महिलांच्या प्रतिक्रिया

Sambhaji Bhide : संभाजी भिडे समाजातली विकृती; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

LayBhari Exclusive : ‘टिकली लावावी की नाही, हे तिसऱ्याने सांगण्याची आवश्यकता नाही!’; अभिनेत्री अनिता दाते हिची प्रतिक्रिया

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार देशाचे नेते आहेत. आज त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांना लवकर बरे वाटावे यासाठी शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांचा न्युमोनिया देखील बरा झाला असून ते माझ्याशी खूप चांगले बोलले. या भेटीत आमची विविध विषयांवर चर्चा देखील झाली. दरम्यान पवार यांना कालच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्यांना आज रुग्णालयात थांबावे लागले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी