27 C
Mumbai
Saturday, December 3, 2022
घरमहाराष्ट्रएकनाथ शिंदे माझे मित्र...!, तर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले बच्चू कडू?

एकनाथ शिंदे माझे मित्र…!, तर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले बच्चू कडू?

आमदार बच्चु कडू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक विधान केले आहे. बच्चु कडू म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात अजूनही आस्था आहे

आमदार बच्चु कडू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक विधान केले आहे. बच्चु कडू म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात अजूनही आस्था आहे, पण सत्तेत असताना प्रश्न राज्यस्तरावरचे, दिव्यांगाचे, मतदार संघातले प्रश्न सुटत नव्हते, त्यांच्या आजूबाजूचे अधिकारी कामच करत नव्हते. तसेच एकनाथ शिंदे यांच्याशी माझे मैत्रीचे नाते आहे, त्यांच्यामुळेच मी त्यावेळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असे देखील बच्चू कडू यावेळी म्हणाले.
‘प्रहार’चे आमदार बच्चु कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील 50 खोक्यांवरून पेटलेला वादाचा वणवा अद्यापही विझलेला नाही, या वादामुळे सध्या राज्याच्या राजकाणात पुन्हा गुवाहाटी, 50 खोक्यांची जोरदार चर्चा सुरू आहे, त्यातच बच्चु कडू यांनी पुरावे द्या नाहीतर कोर्टात खेचू असे आव्हान देखील आमदार रवी राणा यांना दिले आहे, हा वाद सुरू असतानाच आमदार बच्चू कडू यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यावेळी ते बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर फुटलेले सर्व आमदार सुरतवरून गुवाहाटीला गेले. याबाबत बोलताना बच्चु कडू म्हणाले, गुवाहाटीला जाणे आनंदाचे नव्हते, मात्र माझ्या मतदार संघातील काही कामे पुर्ण झाली नाहीत, तसेच शेतकरी, दिव्यांग यांचे देखील अनेक प्रश्न मविआ सरकारच्या काळात सुटले नाहीत. याबाबत मी तत्तकालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटलो देखील मात्र, त्यांना देखील हे प्रश्न सोडविण्याची इच्छा होती, मात्र त्यांच्या आसपासचे अधिकारीच काम करत नव्हते, दिव्यांगाच्या समस्यांबाबत एकही बैठक मविआ सरकारच्या काळात झाली नाही, असा आरोप यावेळी आमदार बच्चु कडू यांनी केला.
हे सुद्ध वाचा :

NCP Jayant Patil : मंत्रिमंडळ विस्तार न होण्याचे जयंत पाटील यांनी सांगितले कारण

Gujarat Assembly Election 2022 : ‘मोदी-शहां’चा गड पाडण्यासाठी काँग्रेसने कसली कंबर! गुजरात निवडणूकीसाठी आखली खास रणनिती

tata airbus project: महाराष्ट्रातील तरुणांनी दहीहंडी, आरत्या, फटाके, मोर्च्यांपुरतेच मर्यादीत रहायचे का?; छगन भुजबळ यांचा सवाल
उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था आहे, मात्र ते मातोश्रीवर ते जेवढे मजबूत आणि शोभून होते, तेवढे ते वर्षावर नव्हते, मी त्या गोष्टी अनुभवत होतो. मुख्यमंत्री पदाचा कारभार उद्धव ठाकरे यांना पुढे घेऊन कसा जायचा हे माहित नव्हते. याबाबत मी त्यांना दोष देणार नाही, असेही बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी त्यावेळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला, त्यांच्यासोबत माझे मैत्रीचे नाते होते. त्यामुळेच शिंदे यांना त्यावेळी मी नाही म्हणू शकलो नाही असे देखील बच्चु कडू म्हणाले.
गुवाहाटीबद्दल काय म्हणाले बच्चु कडू ?
या मुलाखतीत बोलताना आमदार बच्चु कडू म्हणाले, मी गुवाहाटीला जाऊ नये असे बऱ्याच लोकांना वाटत होते, पण मी गेलो. राजकारणात रणनिती आखताना काही तत्व बाजूला ठेवावी लागतात, मला तिथे गेल्यावर शिंदे गटाला पाठिंबा आहे, असे सांगून परत यायचे होते, मात्र मला परत येता आले नाही, असे देखील यावेळी बच्चू कडू म्हणाले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!