29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde cabinet expansion : चित्रा वाघ एकाकी; शिंदे गट संजय राठोडांच्या...

Eknath Shinde cabinet expansion : चित्रा वाघ एकाकी; शिंदे गट संजय राठोडांच्या पाठीशी, भाजपने हात वर केले, विरोधकांनीही राठोड निर्दोष असल्याचे सांगितले

पुजा चव्हाण या भगिणीच्या आत्महत्येला संजय राठोड हा माजी मंत्री जबाबदार आहे. तो पुन्हा मंत्रीमंडळात सामाविष्ठ झाला हे दुर्दैव आहे. ‘हम लढेंगेभी और जितेंगेभी’ अशी गर्जना चित्रा वाघ यांनी केली आहे.पण त्या एकाकी पडल्याचे दिसत आहे.

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपदावर संधी मिळाल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या आहेत. संजय राठोड यांच्यावर एकेरी शब्दांत त्यांनी तोफ डागली आहे. पुजा चव्हाण या भगिणीच्या आत्महत्येला संजय राठोड हा माजी मंत्री जबाबदार आहे. तो पुन्हा मंत्रीमंडळात सामाविष्ठ झाला हे दुर्दैव आहे. ‘हम लढेंगेभी और जितेंगेभी’ अशी गर्जना चित्रा वाघ यांनी केली आहे. पण त्या एकाकी पडल्याचे दिसत आहे. नव सत्ताधारी व नव विरोधक अशा सगळ्यांनीच राठोड यांची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळे चित्रा वाघ एकाकी पडल्या आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, माजी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, दीपक केसरकर या शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राठोड यांची जोरदारपणे बाजू लावून धरली आहे. गिरीश महाजन यांनीही राठोड यांची बाजू उचलून धरली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तर संजय राठोड हे कधीच दोषी नव्हते, असे म्हटले आहे. भाजपच्या नेत्यांनी बेफाम आरोप केल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपचे नेते एखाद्याचे कौटुंबिक आयुष्य उद्धवस्त करून टाकतील, असा संताप सुद्धा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, संजय राठोड यांना पोलिसांनी क्लिन चीट दिली होती. परंतु लोकशाहीमध्ये भावना व्यक्त करायचा कुणालाही अधिकार आहे. कुणाच्या काही तक्रारी असतील, म्हणणे असेल तर ते आम्ही नक्की ऐकून घेऊ, असे त्यांनी चित्रा वाघ यांच्या संदर्भात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Chitra Wagh On Sanjay Rathod : चित्रा वाघ कडाडल्या, संजय राठोड यांच्या विरोधात पुन्हा रणशिंग फुंकले

Eknath Shinde cabinet Expansion : मंत्रिमंडळातून नितेश राणेंचा पत्ता कट, पण दीपक केसरकरांना संधी

Eknath Shinde cabinet Expansion : वादग्रस्त अब्दुल सत्तार, संजय राठोड यांनाही मिळाली मंत्रीपदाची खूर्ची

दीपक केसरकर म्हणाले की, संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत. बंजारा समाजाची किती बिकट स्थिती आहे ते एकदा पाहा. बंजारा समाजातून पुढे आलेल्या कर्तृत्ववान राठोड यांना केवळ राजकीय कारणास्तव विरोध करणे हे योग्य नाही.

चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेली भूमिका हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या चौकशीत राठोड दोषी नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश केला असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.

शंभूराज देसाई यांनीही चित्रा वाघ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांचा चौकशी अहवाल आलेला आहे. त्यात ते दोषी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही त्यांच्यावर आरोप केले जात असतील तर ते चुकीचे आहे, असे देसाई म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी