28 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंचे आदेश आले; अन एसटी महामंडळ कामाला लागले....

एकनाथ शिंदेंचे आदेश आले; अन एसटी महामंडळ कामाला लागले….

सुरक्षित प्रवासासोबत मन प्रसन्न करणाऱ्या स्वच्छतेला महत्त्व दिले जाणार आहे. बसस्थानके, बसगाड्या, एसटीची स्वच्छतागृहे आदी ठिकाणी स्वच्छतेवर अधिक भर दिला जाईल. एसटी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या ३०२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्देश दिले होते.

आजपर्यंत सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या लाल परीने अर्थात एसटी महामंडळाने आता स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षित प्रवासासोबत मन प्रसन्न करणाऱ्या स्वच्छतेला महत्त्व दिले जाणार आहे. बसस्थानके, बसगाड्या, एसटीची स्वच्छतागृहे आदी ठिकाणी स्वच्छतेवर अधिक भर दिला जाईल. एसटी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या ३०२ व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये महामंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्देश दिले होते.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर एसटीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व बस, स्थानके, स्थानक परिसर, प्रसाधनगृहे स्वच्छ व टापटीप ठेवण्याबाबत कृती आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. स्वच्छतेसाठी आता आगार पातळीवर नियोजन केले जात आहे. ज्या स्थानकांमध्ये एसटीचे स्वच्छता करणारे कर्मचारी उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचारी घेऊन स्वच्छतेचे काम केले जाईल. बस धुण्यासाठी सध्या स्वयंचलित धुलाई यंत्राचा वापर केला जातो. मात्र ज्या ठिकाणी अशा प्रकारे यंत्र उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी त्वरित धुलाई यंत्र घ्यावेत असे निर्देश देण्यात आले आहेत.

बसच्या स्वच्छतेसाठी आता पंचसुत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. बसेसची अंतर्बाह्य सखोल स्वच्छता, बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणे, गळक्या बसेस चालवल्या जाणार नाहीत, याची दक्षता घेणे, बसमधील आसने सुस्थितीत असतील याची दक्षता घेणे, फाटलेली आसने तातडीने दुरुस्ती करून घेणे, बसचा रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घेणे या उपायांचा अवलंब केला जाणार आहे.
हे सुद्धा वाचा :
महापुरूषांची वारंवार बदनामी, महिलांबाबत सत्ताधाऱ्यांच्या बेताल वक्तव्यांविरोधात महाविकास आघाडी काढणार मुंबईत विराट मोर्चा
एकदाचे आंबेडकरी अनुयायांना दादर बंदीचे आदेशच काढा, म्हणजे आपला जीव शांत होईल : अ‍ॅड. विश्वास काश्यप
बिल्डरांच्या फायद्यासाठी कुर्ला रेल्वे स्टेशनला मेट्रो जोडण्याची खोटी माहिती; एमएमआरडीएची बनवाबनवी आरटीआयमधून उघड!

राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटीच्या बसद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. मात्र एसटीच्या बसची अवस्था अनेकदा विदारक असते. अस्वच्छतेमुळे एसटीकडे प्रवासी पाठ फिरवतात. त्यामुळे अधिकाधिक प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी आता स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. त्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच एसटीमध्ये स्वच्छता राहील याकडे लक्ष द्यावे असे निर्देश एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांचे निर्देश प्रशासनाकडे गांभीर्याने घेतले आहेत. त्यामुळे एसटीमधील स्वच्छतेवर अधिक भर देण्यासाठी प्रशासनाने पंचसुत्री कार्यक्रम देखील आखला आहे. एसटीच्या स्वच्छता अभियानाचा लाभ होऊन प्रत्यक्षात किती प्रवाासी वाढतात हे कळेलच. एसटी मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील एसटीला आपली मानून एसटीमध्ये अस्वच्छता होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी