28 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शिवसेनेतून आणखी आमदार, खासदार नेण्याचा सूचक...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा शिवसेनेतून आणखी आमदार, खासदार नेण्याचा सूचक इशारा

या कार्याक्रमात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आपण दीड महिन्यांपूर्वी 50 थर लावले, आता आणखी थर लावणार आहोत. एक प्रकारे यातून त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातले आणखी काही आमदार, खासदार एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यात नकारता येत नाही

दोन वर्षांनंतर महाराष्ट्रात दहीहंडीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे दोन वर्ष सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी नागर‍िकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. या वर्षी राज्य सरकारने दहीहंडीसाठी सार्वजन‍िक सुटटी दिली होती. आपला इरादा बऱ्याच अंशी पूरा झाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी दहीहंडीला ते उपस्थित होते. ही दहीहंडी आनंद दिघे यांनी सुरु केली होती. यावेळी अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील या कार्यक्रमाला उपस्थ‍ित होती.

या कार्याक्रमात बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की, आपण दीड महिन्यांपूर्वी 50 थर लावले, आता आणखी थर लावणार आहोत. एक प्रकारे यातून त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातले आणखी काही आमदार, खासदार एकनाथ शिंदे गटात जाण्याची शक्यात नकारता येत नाही. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जायचं आहे का असे विचारले.

टेंभीनाका ही गोविंदाची पंढरी आहे. दिघे साहेबांची इच्छा होती की, ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा. ती पुर्ण झाली. मला अजूनही वाटत नाही की, मी मुख्यमंत्री झालो आहे. तुम्ही सगळे मुख्यमंत्री झाला आहात अशी भावनिक साद त्यांनी नागरिकांना यावेळी घातली. गेल्या अनेक दिवसांपासून ते हे वाक्य वारंवार बोलतांना दिसत आहेत. त्यांच्या सततच्या दिल्ली वाऱ्या सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी लोकांना भावनिक साद घालण्याची कला आत्मसात केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

सण उत्सव, खेळ, योजना यांची खैरात करुन शिंदे फडणवीस सरकार लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवाय महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सणांच्या माध्यमातून त्यांचे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. एकंदरीतच एकनाथ शिंदे सरकारने आज दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर आनंदोत्सव साजरा केला. मुंबई आणि ठाणे महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्साह भरण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले. दहीहंडी या सणाला पुन्हा एकदा राजकीय रंग चढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

Rape Case : बास्केटबाॅल सरावाच्या वेळी बलात्काराचा प्रयत्न, खेळाडू गंभीर जखमी

Maharashtra Sea : महाराष्ट्राचा समुद्र किनारा सुरक्षित आहे का ?

CBI : महाराष्ट्रात पुन्हा सुरू होणार सीबीआयचा सिलसिला

यावर्षी राज्य सरकारने 10 लाखांचा विमा जाहिर केला आहे. प्रो. गोविंदा स्पर्धा भरवण्यात येणार आहेत.‍ गोविंदांना 5 टक्के कोटा नोकरीमध्ये मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोव‍िडचे संकट अजून गेले नाही. साथीचे रोग पसरत आहेत. संशय आला तर तपासणी करा.या वर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्स मोठया प्रमाणात करु. यावेळी त्यांनी नागरिकांबरोबर सेल्फी देखील काढली.

तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी ढोल वाजून आनंदोत्सव साजरा केला. ते ढोल ताशाच्या नादावर नाचत होते. तर गिरगावमध्ये आदित्य ठाकरे यांनी दहीहंडीमध्ये सहभाग घेतला. आजच्या दिवशी कोणतीही राजकीय गोष्ट करायची नाही असे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी