34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी : फुकट प्रवासाचा वृद्धांनी उचलला फायदा, चार दिवसांत 1.50 लाख...

मोठी बातमी : फुकट प्रवासाचा वृद्धांनी उचलला फायदा, चार दिवसांत 1.50 लाख जणांनी केला प्रवास

मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी वृद्ध नागरिकांसाठी एसटीच्या मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे. त्याचा अनेक नागर‍िकांनी लाभ उठवला आहे. चार दिवसांत महाराष्ट्रामध्ये तब्बल 1.50 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीचा  मोफत प्रवास केला.

मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी वृद्ध नागरिकांसाठी एसटीच्या मोफत प्रवासाची योजना सुरु केली आहे. त्याचा अनेक नागर‍िकांनी लाभ उठवला आहे. चार दिवसांत महाराष्ट्रामध्ये तब्बल 1.50 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीचा  मोफत प्रवास केला. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली. 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान सुमारे 1 लाख 51 हजार जणांनी एसटीमधून फुकट प्रवास केला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी एसटीचे (ST) चांगलेच कंबरडे मोडले आहे.

अगोदरच सुमारे 10 वर्षांपासुन एसटी तोटयात आहे. त्यामध्ये मागच्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घ काळ संप पुकारला. कोरोना महामारीमुळे एसटी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मुळातच एसटी प्रचंड मोठया तोटयात सापडलेली आहे. तिचा कणा मोडला आहे. त्यामध्ये सरकारच्या या निर्णयामुळे एसटीचे तिनतेरा वाजणार आहेत हे मात्र खरे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास करता यावा तसेच 65 ते 75 वर्षां दरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून 50 टक्के सवलत मिळावी अशी घोषणा केली होती.

हे सुद्धा वाचा

Aam Aadmi Party : महाराष्ट्रातल्या वादांचा लाभ आम आदमी पार्टी उठवू शकते

Gautam Adani : गौतम अदानी ठरले जगातले तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

अष्टविनायक दर्शन : सातवा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर

25 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेसाठी प्रमाणपत्रांचे वितरण करुन योजनेचा शुभारंभ केला होता. तर 26 ऑगस्ट पासुन मोफत प्रवासाला सुरुवात झाली होती. या योजनेला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ हे नाव दिले असून, महाराष्ट्रात कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.

नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ घेता यावा यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, निवडणूक ओळखपत्र तसेच केंद्र आणि राज्य शासनाने निर्गमित केलेले ओळखपत्र दाखवल्यास 75 वर्षावरील नागर‍िकाला मोफत प्रवास करता येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे 34 लाख 88 हजार ज्येष्ठ नागरिकांनी स्मार्ट कार्डासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 14 लाख 69 हजार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी