34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार प्रकरणी वृध्दाला 10 वर्ष शिक्षा

अल्पवयीन मेव्हणीवर बलात्कार प्रकरणी वृध्दाला 10 वर्ष शिक्षा

मुंबई सेशन कोर्टाने एका वृद्ध आरोपीला 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावणी आहे.आरोपीने त्याच्या 14 वर्षीय मेव्हणीवर सतत लैंगिक अत्याचार केले होते.यातून बळीत अल्पवयीन मुलीला मुलगा झाला आहे.

वृध्द आरोपी आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतो. तो,त्याची पत्नी ,मुलं अस त्याच कुटुंब आहे. त्याच्या सोबत त्याची 14 वर्षीय मेव्हणी ही राहत होती.यावेळी आपल्या 14 वर्षीय मेव्हणीवर तो नियमित लैंगिक अत्याचार करत होता.एकदा मेव्हणीच्या पोटात दुखू लागल्यावर तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नेव्यात आलं.यावेळी मेव्हणी चार महिन्याची गरोदर असल्याचं उघडकीस आलं.यानंतर त्यांच्या कुटुंबात खळबळ माजली. मेव्हणीला विचारलं असता ती तिच्या बॉयफ्रेंडच नाव सांगू लागली.

मात्र, तिला बऱ्याच वेळा विचारल्या नंतर तिने खर सांगितलं.भावजी आपल्यावर सतत लैंगिक अत्याचार करत असल्याचं तिने सांगितलं. भावजी ने आपल्याला धमकावले आहे.यामुळे आपण बॉयफ्रेंड बाबत बोललो.मात्र ते खोटं असल्याचं तिने सांगितले.यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीला अटक करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

कोल्हापूर येथील संपत्तीच्या वादातून तरुणांची मुंबईत हत्या.मामे भावाने केली हत्या.

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रीया; शरद पवारांच्या निर्णयावर काय म्हणाले ?

नरेंद्र मोदींचा कर्नाटक प्रचारात ‘द केरळ स्टोरी’ च्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर घणाघात

हा खटला विशेष कोर्टाच्या न्यायमूर्ती सीमा जाधव यांच्या कोर्टात चालला.त्यांनी नुकताच निकाल दिला आहे.आरोपीने घृणास्पद अस कृत्य केलं आहे.आरोपीने जे कृत्य केलं आहे त्यामुळे बळीत मुलीवर आयुष्यभर सायकॉलॉजीकल परिणाम होणार आहे.यामुळे आरोपीला 10 वर्ष सक्त मजुरी अशी शिक्षा आपण सूनवत आहोत, अस न्यायमूर्ती म्हणाल्या.

Elderly man sentenced to 10 years for raping minor sister-in-law

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी