30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्रGramPanchayat Election : राज्यात 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू

GramPanchayat Election : राज्यात 7,751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूका जाहीर; आचारसंहिता लागू

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपणाऱ्या राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या नुवडणुका जाहीर केल्या आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पहिल्यांदा निवडणुकांचा मोठा धुरळा उडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपणाऱ्या राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या नुवडणुका जाहीर केल्या आहेत. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.राज्यात 7751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांची तसेच थेट सरपंच पदासाठी देखील निवडणूक होणार आहे. या निवडणूकांसाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण््यात आली असल्याची माहिती, राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील, असे देखील त्यांनी सांगितले आहे.

राज्यात होणाऱ्या या निवडणुकांसाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये निवडणूकीसाठी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्याची मुदत असणार आहे. तर अर्जांची छाननी 5 डिसेंबर रोजी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. तर 7 डिसेंबर रोजीच निवडणूक चिन्हांचे वाटप देखील होणार आहे. तर मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असणार असून राज्यातील नक्षलग्रस्त भागामध्ये मतदानाची वेळी दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे.
हे सुद्धा वाचा :

Sanjay Raut Bail : आता मी पुन्हा लढेन, कामाला सुरुवात करेन; संजय राऊतांची जामीन मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया!

Bharat Jodo Yatra in Maharashtra : शरद पवार भारत जोडो यात्रेला राहणार गैरहजर

Deepali Sayyad : ‘उद्धवां’ची साथ सोडत दीपाली सय्यद ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’

राज्यातील जिल्हानिहाय ग्रामपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकांची संख्या पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर जिल्ह्यात 203 ग्रामपंचायती , अकोला जिल्ह्यात 266 ग्रामपंचायती, अमरावती जिल्ह्यात 257 ग्रामपंचायती, औरंगाबाद जिल्ह्यात 219 ग्रामपंचायती, बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायती, भंडारा जिल्ह्यात 363 ग्रामपंचायती, बुलडाणा जिल्ह्यात 279 ग्रामपंचायती, चंद्रपूर जिल्ह्यात 59 ग्रामपंचायती, धुळे जिल्ह्यात 128 ग्रामपंचायती, गडचिरोली जिल्ह्यात 27 ग्रामपंचायती, गोंदिया जिल्ह्यात 348 ग्रामपंचायती, हिंगोली जिल्ह्यात 62 ग्रामपंचायती, जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायती, जालना जिल्ह्यात 266 ग्रामपंचायती, कोल्हापूर जिल्ह्यात 475 ग्रामपंचायती, लातूर जिल्ह्यात 351 ग्रामपंचायती, नागपूर जिल्ह्यात 237 ग्रामपंचायती, नंदुरबार जिल्ह्यात 123 ग्रामपंचायती, उस्मानाबाद जिल्ह्यात 166 ग्रामपंचायती, पालघर जिल्ह्यात 63 ग्रामपंचायती, परभणी जिल्ह्यात 128 ग्रामपंचायती, पुणे जिल्ह्यात 221 ग्रामपंचायती, रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायती, रत्नागिरी जिल्ह्यात 222 ग्रामपंचायती, सांगली जिल्ह्यात 452 ग्रामपंचायती, सातारा जिल्ह्यात 319 ग्रामपंचायती, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 ग्रामपंचायती, सोलापूर जिल्ह्यात 189 ग्रामपंचायती, ठाणे जिल्ह्यात 42 ग्रामपंचायती, वर्धा जिल्ह्यात113 ग्रामपंचायती, वाशीम जिल्ह्यात 287 ग्रामपंचायती, यवतमाळ जिल्ह्यात 100 ग्रामपंचायती, नांदेड जिल्ह्यात 181 ग्रामपंचायती व नाशिक जिल्ह्यात 196 ग्रामपंचायती अशा एकूण 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी