27 C
Mumbai
Wednesday, August 3, 2022
घरमहाराष्ट्रस्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !

स्त्री लंपट भाजप नेत्याची अखेर हकालपट्टी !

टीम लय भारी

सोलापूर : भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये श्रीकांत देशमुख यांनी एका महिलेची फसवणूक केल्याचे स्वतः त्या महिलेकडून सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ आज मंगळवारी (दि. १२ जुलै २०२२) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या पत्रात श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा स्वीकारण्यात आले आहे, असे सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मात्र या घटनेनंतर भाजपची बदनामी टाळण्यासाठीच श्रीकांत देशमुख यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

श्रीकांत देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आल्यानंतर लगेच सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षाचा पदभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्रीकांत देशमुख यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भाजपचे हे लंपट महाशय या महिलेला धक्काबुक्की करताना पण दिसून येत आहेत.

हे सुद्धा वाचा :

राजनाथ सिंह ‘सलाम वालेकूम‘ का म्हणाले?

उद्धव ठाकरेंविरोधात संतोष बांगर यांचे मुंबईत शक्ती प्रदर्शन

गुरूदेव दर्शन सहज शक्य! ‘शिर्डी’ आणि ‘अक्कलकोट’साठी एसटीच्या सुरू होणार विशेष फेऱ्या

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!