34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रसाईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान

साईबाबांच्या तिजोरीत 5 कोटी 12 लाखांचे दान

टीम लय भारी

अहमदनगर: करोना महामारीनंतर या वर्षी सण उत्सवांना सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर शिंर्डीमध्ये साई भक्तांनी हजेरी लावली होती. शिर्डीत पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांनी साईचरणी कोट्यवधीचे दान दिले आहे. तीन दिवसांत एकूण 5 कोटी 12 लाख रूपयांचे दान बाबांच्या झोळीत अर्पण केले आहे.

दोन वर्षाच्या कोरोना निर्बंधानंतर या वर्षी साईभक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा उत्सव पार पडला. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात तीन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी साईदर्शनाला हजेरी लावली. शिर्डीत आलेल्या साई भक्तांनी बाबांच्या झोळीत सोने, चांदीसह कोट्यावधी रूपयांचे दान दिले आहे. उत्सवाच्या तीन दिवसात एकूण 5 कोटी 12 लाख रूपये भक्तांच्या देणगीतून प्राप्त झाले आहे.

दान पेटीत 2 कोटी 17 लाख देणगी, कांऊटरवर 1 कोटी 59 लाख, ऑनलाईन डोनेशन 1 कोटी 36 लाख, परकीय चलन 19 लाख, 22 लाखांचे सोने तर 3 लाख रूपयांची चांदी असे एकूण 5 कोटी 12 लाखांचे भरभरून दान भक्तांनी अर्पण केले आहे. कोरोना काळात शिर्डीच्या साईमंदिरासह व्यावसायिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली होती. आता मात्र भक्त दान वाढत असल्याने शिर्डीची आर्थिक घडी पुन्हा बसताना दिसत आहे. आलेल्या दानातून साईसंस्थान भाविकांसाठी सुविधा रूग्णसेवा आणि शिक्षणासाठी खर्च करत असते.

हे सुध्दा वाचा:

जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! महाराष्ट्र भाजपचे जाहीर आवाहन

शिंदे गटाची क्रेझ वाढली! कोल्हापूरचे शिवसेना खासदार संजय मंडलिक यांचा लवकरच शिवसेनेला रामराम?

इंदौरहुन पुण्याला येणारी ‘महाराष्ट्र राज्य परिवहन’ची बस नर्मदा नदीमध्ये कोसळली; बसमध्ये 55 प्रवासी होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी