27 C
Mumbai
Tuesday, September 5, 2023
घरमहाराष्ट्रAshtavinayak Darshan: अष्टविनायक दर्शन - पहिला 'गणपती' कऱ्हेच्या तीरावरचा 'मोरेश्वर'

Ashtavinayak Darshan: अष्टविनायक दर्शन – पहिला ‘गणपती’ कऱ्हेच्या तीरावरचा ‘मोरेश्वर’

आपल्या महाराष्ट्रात‍ गणपतीची आठ मंदीरे आष्टविनायक या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या पैकी पहिले आहे. 'मोरेश्वर' गणपती मोरगाव मोरेश्वर गणपती पुणे जिल्हयातील बारामती तालुक्यात आहे.

‘सुखकर्ता’ आणि ‘दु:खहर्ता’ अशी गणपतीची ओळख आहे. विद्येची देवता म्हणजे ‘गणपती’. कोणत्याही शुभकार्यात प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. त्यानंतर कामाला सुरुवात केली जाते. दरवर्षी वर्षांतून दोन वेळा गणेशोत्सव साजरा केला जातो. एक ‘भाद्रपद ‘ महिन्यात आणि दुसरा ‘माघ’ महिन्यात आता भाद्रपद महिन्यातल्या गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. सगळीकडे गणपतींच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. आपल्या महाराष्ट्रात‍ गणपतीची आठ मंदीरे ‘अष्टविनायक’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्या पैकी पहिले आहे. ‘मोरेश्वर’ गणपती मोरगाव मोरेश्वर गणपती पुणे जिल्हयातील बारामती तालुक्यात आहे.

मोरेश्वर गणपती हे गणेशाचे ‘आद्यपीठ’ म्हणून ओळखले जाते. या तिर्थक्षेत्राची ‘भूस्वानंद भुवन’ अशी ओळख आहे. महाराष्ट्रातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे एक आद्यपीठ आहे. भृशुंडी ऋषींच्या सांगण्यावरुन या गणेश पीठाची स्थापना झाली. या गणेशाने मोरावर बसून सिंधू कमलासुर दैत्याचा वध केला. त्याचे मोर हे वाहन असल्यामुळे हा गणपती मोरश्वर या नावाने प्रसिद्ध आहे. वर्षातून दोन वेळा या गणेशाचा पालखी उत्सव होतो. मयुरेश्वर मंदरात समर्थ रामदासांनी ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ या आरतीची रचना केली. उत्सवाच्या वेळी गणपतीला तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर गणपतीची पालखी गावात मिरवली जाते.

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पाच दिवसांत येथे मोठी यात्रा भरते. यात्रेच्या वेळी गणपतीला कऱ्हा नदीच्या कुंडात स्नान करुन दर्शन घेतले जाते. भाद्रपद महिन्यातील यात्रा ही सर्वांत मोठी यात्रा आहे. कऱ्हा नदीच्या तीरावर मोरगाव वसले आहे. या गावात कोणाच्याही घरात भाद्रपद महिन्यात गणपती बसवले जात नाही. सर्व गावकरी केवळ मयुरेश्वराची आराधना करतात. गणेश चतुर्थीच्या आधी तीन दिवस पहाटे 5 ते दुपारी 12 या वेळेमध्ये मयुरेश्वराला स्वहस्ते जलस्नान घालण्याची भाविकांना व ग्रामस्थांना मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो.

उत्सव काळात पहिल्या दिवसापासून विविध कार्याक्रमांचे आयोजन केले जाते. पूर्वीच्या काळी सिंधू नावाच्या असुराने धुमाकूळ घातला होता. त्यावेळी गणपतीने मयुरावर आरुढ होऊन मोरगाव येथे सिंधू असुराचा वध केला. त्यामुळे या गणपतीला ‘मयुरेश्वर’ हे नाव पडले. हे ठ‍िकाण पुण्यापासून 64 किलोमीटर वर आहे. पुण्याहून सासवड, जेजुरीमार्गे मोरगाव हे 77 किमी अंतर आहे. पुण्याहून सोलापूर महामार्गाने चौफुलामार्गाने देखील मोरगावला जाता येते.

हे सुद्धा वाचा

Rahul Dravid Tests Positive : राहुल द्रविडला कोरोनाची लागण, भारतीय संघापुढे वाढले आव्हान

the path of fire :’अग्न‍िपथ’ योजनेबद्दल जनजागृती करणाऱ्या ‘भारत के अग्निवीर’ चित्रपटाचा मुहूर्त राज्यपालांच्या हस्ते

Sonam Kapoor : सोनम कपूरच्या ‘आई’ पणाचे केले सर्वांनी कौतुक

या मंदिराची वैशिष्ट्ये

या मंद‍िराची मुख बांधणी ही मशिदीसारखी दिसते. त्याची मांडणी प्रशस्त गढीप्रमाणे आहे. मंद‍िर काळया दगडापासून तयार करण्यात आले आहे. ते बहामनी काळात बांधले आहे. हे मंद‍िर गावाच्या मध्यभागी आहे. चारही बाजूंनी याला मनोरे आहेत. मोगल काळात या मंदिरावर आक्रमण होऊ नये, म्हणून मंदिराला मश‍िदी सारखा आकार देण्यात आला आहे. मंदिराच्या बाजून 50 फुट उंचीची संरक्षक भींत आहे. मुख्य प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम, सभामंडप, दर्शनमंडप आणि मुख्य गाभारा आहे.

मूर्तीची वैशिष्ट्ये

गाभाऱ्यात मुयरेश्वराची डाव्या सोंडेची, उत्तराभिमुख बैठी मूर्ती आहे.  मूर्तीच्या डोळयांमध्ये माणिक व नाभीमध्ये हिरा आहे. मस्तकावर नाग फणा आहे. मूर्तीच्या डाव्या व उजव्या बाजूला रिद्धी, सिद्धीची प‍ितळी मूर्ती असून, पुढे मूषक व मयुर आहे. मयुरेश्वर गणपती समोर नंदीची मूर्ती आहे. तसेच उंच बसलेली मूषकाची मूर्ती आहे. इतही देवदेवतांच्या मूर्ती आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी