33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रRatnagiri News : माजी पंचायत समिती सभापती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

Ratnagiri News : माजी पंचायत समिती सभापती बेपत्ता झाल्याने एकच खळबळ

रत्नागिरी जिल्ह्यातील माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या मागच्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. स्वप्नाली सावंत या 1 सप्टेंबर रोजी घरातील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या आहे, त्यांचा फोन सुद्धा त्यांनी घरीच ठेवला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील एक खळबळजनक वृत्त समोर आले आहे. जिल्ह्यातील माजी पंचायत समिती सभापती महिला बेपत्ता झाली आहे. तब्बल 10 दिवसांपासून ही महिला बेपत्ता असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला असून ही घटना बेपत्ता की घातपात याचा शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी प्राथमिक संशय त्यांच्यावर असल्याचे सांगितले आहे. या घटनेचे कळताच पोलिस शहराच्या आसपासच्या परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने कसून शोध घेत आहेत परंतु अद्याप पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. माजी पंचायत समिती सभापती महिला बेपत्ता होण्याने राजकीय वर्तुळात मात्र उलट – सूलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत या मागच्या 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत. स्वप्नाली सावंत या 1 सप्टेंबर रोजी घरातील कोणालाही न सांगता बेपत्ता झाल्या आहे, त्यांचा फोन सुद्धा त्यांनी घरीच ठेवला आहे. स्वप्नाली बेपत्ता झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी त्यांचे पती सुकांत सावंत यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा…

BJP appoints new state In charge : भाजपमधील चार मराठी नेत्यांचे प्रमोशन!

Ganpati Visarjan 2022 – ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’

Congress President Election: राहुल गांधी – पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकी बद्दल कोणताही गोंधळ नाही

सुकांत सावंत यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असली तरीही प्राथमिक संशय म्हणून पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेले सुकांत हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत. त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचे असून याआधी त्यांच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे पत्नी बेपत्ता होण्यामागे सुकांत यांचा हात असू शकेल का याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. बेपत्ता स्वप्नाली यांचा शहराच्या आसपासच्या परिसरात डॉग स्कॉडच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे परंतु अद्याप ठोस असे काहीच कळालेले नाही.

काल दिवसभर सुद्धा पोलिसांकडून शोध सुरूच होता. स्वप्नाली सावंत ज्या ज्या ठिकाणी जाऊ शकतील किंवा जातात अशा सगळ्यांच ठिकाणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. रत्नागिरी जवळच तळवल येथे त्यांचे माहेर आहे, तिथे सुद्धा त्यांचा शोध घेण्यात आला परंतु तिथे सुद्धा स्वप्नाली सावंत गेल्या नसल्याचे लक्षात आले. स्वप्नाली सावंत यांचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून पथके तयार करण्यात आली असून ही पथकांकडून दिवसरात्र शोधकार्य सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी