32 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रEx MLA Ashok Patil : शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांचा शिंदे...

Ex MLA Ashok Patil : शिवसेनेचे माजी आमदार अशोक पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

भांडुप विधानसभेचे माजी आमदार अशोक पाटील हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. अशोक पाटील यांनी त्यांच्या भांडुपमधील कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लागलेली गळती अद्यापही थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेमधून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या कमी असली तरी शिवसेनेवर नाराज होऊन काही माजी आमदार आणि नेते आजही उद्धव ठाकरे यांची शिवसेनेतून बाहेर पडत आहेत. भांडुप विधानसभेचे माजी आमदार अशोक पाटील (Ex MLA Ashok Patil) हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. अशोक पाटील यांनी त्यांच्या भांडुपमधील कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या गटाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडताना अशोक पाटील यांनी तीव्र नाराजी दर्शविली आहे. तसेच अशोक पाटील यांनी शिवसेनेवर आणि शिवसेनेतील नेत्यांवर टीका सुद्धा केली.

गेल्या कित्येक वर्षांपासून मला अपमानास्पद वागणूक मिळत होती. अनेक वर्ष शिवसेनेत काम करून आमदार झालो. पण नंतर मात्र माझा अपमान करत कार्यक्रमांना न बोलवणे आदी प्रकार शिवसेनेतील काही नेत्यांकडून सुरु करण्यात आले. उद्धव ठाकरे यांना मी काही तरी सांगेल, या भीतीपोटी त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी मला त्यांना भेटू दिले नाही, असा आरोप माजी आमदार अशोक पाटील यांनी केला.

शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासुन मिळणाऱ्या मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे अशोक पाटील अस्वस्थ झाले होते. याबाबत ते अनेक वेळा पक्ष श्रेष्ठींशी सुद्धा बोलले होते, पण याची दखल कोणाकडूनही घेतली गेली नाही, अशी खंत अशोक पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी अशोक पाटील यांच्याकडून खासदार विनायक राऊत यांच्यावर देखील आरोप करण्यात आले. विनायक राऊत यांनी विक्रोळीमध्ये बैठका लावून गैरसमज पसरवण्याचे काम केले, असेही अशोक पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Raj Thackeray : लाचार होऊन निवडणूक लढवू नका : राज ठाकरे

Breaking : शिवसेनेतील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Shivsena Vs Shidesena : शिवसेनेचा खरा वारसदार आज ठरणार? कोर्टाच्या सुनावणीसाठी उत्सुकता वाढली

दरम्यान, अशोक पाटील यांनी नंदनवन येथे जाऊन कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करून त्यांना समर्थन दिले. शिवसेनेने कोळी बांधवांसाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे कोळी बांधव देखील शिवसेनेवर नाराज आहेत, कोळी बांधवांचे प्रश्न दिल्लीत जाऊन मांडण्यात आले पण काही झाले नाही. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोळी बांधवांना न्याय मिळवून देतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे आणि त्याचमुळे आम्ही नंदनवन येथे येऊन शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याचे माजी आमदार अशोक अप्टिल यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी