28 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरमहाराष्ट्रआमदारांना फसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक

आमदारांना फसवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना अटक

टीम लय भारी

मुंबई : राज्यात नवे सरकार स्थापन होऊन सुद्धा अद्यापही मंत्रिमंडळाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही आमदारांकडून स्वतःची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. याचाच फायदा घेऊन मंत्री पद देण्याच्या उद्देशाने चार जणांकडून आमदारांना फसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या विभागाने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गटात असे अनेक आमदार आहेत जे मंत्री पद मिळविण्यासाठी जमतील ते प्रयत्न करत आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची वारंवार भेट देखील घेत आहेत. याचाच फायदा घेत आम्ही तुम्हाला मंत्री पद देतो, त्यासाठी १०० कोटी द्यावे लागतील असे सांगून आमदारांची फसवणूक करण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना अटक(Arrested) करण्यात आली आहे.

रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली थोड्या थिडक्या नाही तर १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. महत्वाची बाब म्हणजे एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून याप्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणात हे चौघे किती आमदारांच्या संपर्कात होते ? किती आमदारांनी यांच्या जाळ्यात फसून यांना पैसे दिले असा सर्व तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे, या आरोपींनी आधी आमदारांना फोन केला, त्यानंतर आम्ही दिल्लीहून आलो आहोत, असे आमदारांना सांगितले. दिल्लीतील मोठ्या मंत्र्यानी तुमचे बायोडेटा मागविले आहेत. असे सांगत आमदारांशी फोनवरून संपर्क साधला. हे आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी आमदारांची ओबेरॉय हॉटेल मध्ये भेट घेतल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा :

शरद पवारांचे निकटवर्तीय ‘प्रफुल्ल पटेलां’ना ईडीचा जोरदार धक्का

अविवाहित महिलांच्या गर्भपातासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

सोनिया गांधीच्या चौकशीवर ‘यशवंत सिन्हां’नी केली टीका

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!