30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रDahi Handi 2022 : शासकीय रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार

Dahi Handi 2022 : शासकीय रुग्णालयामध्ये जखमी गोविंदांवर होणार मोफत उपचार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार दहीहंडी कार्यक्रमामध्ये कोणताही गोविंदा जखमी झाला तर त्या गोविंदावर त्या ठिकाणच्या आसपास असणाऱ्या शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्यात येतील.

तब्बल दोन वर्षानंतर राज्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सर्व गोविंद पथकांनी आपला सराव सुरु केला होता, आणि आज अखेर सर्व गोविंदा (Govinda) पथक उंचच उंच थर लावून आपला जन्माष्टमी धुमधडाक्यात साजरा करण्यास सज्ज झाले आहेत. अशातच नवनिर्वाचित भाजप-शिंदे सरकारने गोविंदा पथकांसाठी काही महत्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या दिवशी राज्यात सार्वजिनक सुट्टी जाहीर केली. त्यानंतर आता दहीहंडीला खेळाचा दर्जा देत दहीहंडी पथकातील गोविंदांना सरकारी नोकऱ्यांमध्ये गोविंदांना पाच टक्के आरक्षण देण्याची महत्वपूर्ण घोषणा एकनाथ शिंदे सरकारने केली आहे. त्याचबरोबर दहीहंडीच्या थरावरून पडून कोणताही गोविंदा जखमी झाल्यास त्या गोविंदाला शासकीय रुग्णालयात मोफत उपचार देण्यात यावेत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार दहीहंडी कार्यक्रमामध्ये कोणताही गोविंदा जखमी झाला तर त्या गोविंदावर त्या ठिकाणच्या आसपास असणाऱ्या शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार करण्यात येतील. वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद यांचे दवाखाने इत्यादी ठिकाणी जखमी गोविंदांवर मोफत उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

Dahi Handi 2022 : ‘दहीहंडी’चा खेळात समावेश, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Dahihandi Insurance 2022 : गोविंदांना मुंबई भाजपकडून 10 लाखांचे विमा कवच जाहीर

दहीहंडी, गणेशोत्सवाबाबत नवे सरकार काय निर्णय घेणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे. तसेच गोविंदा पथकातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये जर एखाद्या गोविंदाचा थरावरून पडून मृत्यू झाला तर त्याला १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. गंभीर जखमी झालेल्या गोविंदाला सात लाख ५० हजार रुपये आणि हात-पाय जायबंदी झालेल्या गोविंदांना पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे.

एकंदरीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोविंदांसाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. ज्यामुळे गोविंदांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असलेले पाहावयास मिळत आहे. यंदा राज्यात अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांकडून लाखो रुपयांच्या दहिहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर राज्यात सर्व सॅन उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. तसेच यंदाच्या वर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव हे दोन्ही सण निर्बंधमुक्त साजरे होणार असल्याने नागरिकांमध्ये अधिकचा उत्साह पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी