34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रGanesh Katkar : भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी गणेश काटकर...

Ganesh Katkar : भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी गणेश काटकर यांची नियुक्ती

भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी महाराष्ट्रातील वडजल (ता. माण) चे सुपुत्र गणेश काटकर यांची नियुक्ती करण्यात झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

भारतीय अन्न महामंडळाच्या सल्लागार समिती सदस्य पदी महाराष्ट्रातील वडजल (ता. माण) चे सुपुत्र गणेश काटकर यांची नियुक्ती करण्यात झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भारतीय अन्न महामंडळ ही प्रामुख्याने अन्नधान्य उत्पादन आणि ग्राहक हित जोपासण्यासाठी काम करणारी एक समिती आहे. ही समिती थेट भारताच्या केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम करत असते. महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये या समितीचे जाळे विस्तारलेले आहे. भारतीय अन्न महामंडळाचे तब्बल 3 लाख 24 हजार कोटी रुपये बजेट आहे. अन्नधान्य उत्पादक आणि ग्राहक यांचे हित रक्षण करणे, तसेच अन्न धान्य खरेदी, त्याची साठवणूक आणि पुरवठा करण्यासाठी धोरणे आखणे व केंद्र सरकारला सल्ला देणे असे या समितीचे मुख्य उद्देश आहेत. राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय खाद्य महामंडळाच्या वखारी आहेत. या समितीच्या सदस्य पदी गणेश कातकर यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

भारतीय अन्न निगम हा भारत सरकारच्या एका कायद्यान्वये जानेवारी 1965 मध्ये स्थापन करण्यात आलेला निगम आहे. अन्नधान्यांच्या व तत्सम आवश्यक वस्तूंच्या खाजगी क्षेत्रातील व्यापारात उत्पादक शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे हितसंरक्षण करणे, हा याच्या स्थापने मागील प्रधान हेतू आहे. भारत सरकारच्या अन्नधान्यांसंबंधीच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे सदर निगम हे महत्वाचे साधन आहे. धान्यांची देशांतर्गत खरेदी, साठवण, वाहतूक, विक्री आणि वाटप जरूर तेव्हा एकाधिकाराने करण्याच्या कामी या निगमाचा उपयोग करून घेतला जातो. शेतकऱ्यांकडून होणाऱ्या धान्यमालाच्या विक्रीत या निगमाचा हिस्सा वाढता ठेवून, परिणामी किंमती आणि धान्यसाठ्यांसंबंधीचे शासकीय धोरण कार्यवाहीत आणणे, असे निगमाच्या कामकाजाचे मुख्य पैलू मानता येतात.

हे सुद्धा वाचा

NZ vs IND : भारताचा ‘सुर्या’ अजून तळपतोय! किवीं विरोधात झळकावले शानदार शतक

Shraddha Walker murder : श्रद्धाने आफताबविरोधात 2020साली केली होती पोलिस तक्रार!

Jaya Bachchan : साडीबाबत जया बच्चन यांनी मांडले परखड मत

दरम्यान, या निवडीबद्दल गणेश काटकर यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मातब्बर लोकांनी कातकर यांचे अभिनंदन केले आहे. शिवाय भविष्यातील वाटचालीसाठी कातकर यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. याचप्रमाणे या समितीत काम करण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करत कातकर आगामी काळात जनतेच्या हितासाठी समाजसेवेचे कार्य प्रमाणिकपणे करत राहतील असा विश्वासदेखील या मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी