33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2022 : गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत गावकऱ्यांचा राडा, तंटामुक्तीचे वाजले तीनतेरा

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सव नियोजनाच्या बैठकीत गावकऱ्यांचा राडा, तंटामुक्तीचे वाजले तीनतेरा

बैठकीत वाद बऱ्याचदा होतात, परंतु ते दरवेळी सामंजस्याने, मध्यस्तीने सोडवण्यात येतात. हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार या बैठकीत घडला आहे. नांदगाव तांडा हे तंटामुक्ती गाव असल्याने या गावात कोणताच तंटा होणार नाही याची खबरदारी घेणे गरजचे असताना हल्ल्याची घडलेली घटना तंटामुक्तीच्या नावासाठी नक्कीच लाजीरवाणे ठरत आहे. 

गणेशोत्सवाचा सण तोंडावर आल्याने सगळ्यांचीच लगबग सुरू झाली आहे. गणपतीसाठी अनेक जण गावाला जाणे पसंत करतात, त्यामुळे गणपतीच्या या सणाला गाव अगदी गजबजून गेलेली दिसतात. गावागावानुसार गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात, परंतु त्याच्या नियोजनासाठी होणाऱ्या बैठकांचे नियोजन जवळपास सारखेच असते. औरंगाबाद येथे सुद्धा गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यासाठी, त्याच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, परंतु बैठकीत चर्चेऐवजी कलह निर्माण झाला आणि यामध्ये तंटामुक्ती अध्यक्षालाच धारदार वस्तुने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बैठकीत वर्गणीचा विषय निघाला तेव्हा हा वाद वाढल्याचे कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील सोयागाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे गणेशोत्सव, भंडारा आणि यात्रेच्या निमित्ताने गावकऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. या तिन्ही उत्सवाचे नियोजन आणि वर्गणी हेच महत्त्वाचे मुद्दे या बैठकीत मांडण्यात येणार होते. या बैठकीसाठी नेहमीप्रमाणे सर्व गावकरी, गावातील प्रतिष्ठित मंडळींनी उपस्थिती दर्शवली होती. या येणाऱ्या सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश चव्हाण हे विषय मांडून आपली भूमिका मांडत होते.

हे सुद्धा वाचा…

Shivsena Vs Shindesena : ‘धनुष्यबाण’ ही निशाणी शिंदे गटालाच मिळणार, शिंदे गटाचे ठाम मत

Congress President Election : काॅंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली? वाचा सविस्तर…

Asia Cup 2022 : भारत – पाकिस्तानच्या सामन्यात आता नवा ‘ट्विस्ट’, भारतीय संघात मोठे बदल

रमेश चव्हाण हा विषय मांडत असताना गावाकऱ्यांच्या रांगेत बसलेल्या बद्रीनाथ राठोड यांनी लगेचच उठून “गेल्या वर्षीच्या वर्गणीचा हिशोब द्या” असे म्हणून हिशोबाची मागणी केली. त्यावेळी चव्हाण यांनी “तुम्ही गेल्या वर्षी वर्गणी दिलीच नाही” असे राठोड यांना सांगितले. गावकऱ्यांसमोर वर्गणी दिली नसल्याचे सांगितल्याने बद्रीनाथ राठोड यांना राग अनावर झाला आणि राठोड आणि किरण राठोडसह इतर दोघांनी चव्हाण यांच्यावर धारदार वस्तूने हल्ला चढवला.

बैठकीत अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे गावकरी सुद्धा चक्रावून गेले. या हल्ल्यात चव्हाण गंभीररीत्या जखमी झाले. त्यावेळी गावकऱ्यांनीच पुढाकार घेत मध्यस्थी करून सदर भांडण सोडवले आणि चव्हाण यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यानंतर हल्ला करणाऱ्या चार जणांविरोधात सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैठकीत वाद बऱ्याचदा होतात, परंतु ते दरवेळी सामंजस्याने, मध्यस्तीने सोडवण्यात येतात. हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार या बैठकीत घडला आहे. नांदगाव तांडा हे तंटामुक्ती गाव असल्याने या गावात कोणताच तंटा होणार नाही याची खबरदारी घेणे गरजचे असताना हल्ल्याची घडलेली घटना तंटामुक्तीच्या नावासाठी नक्कीच लाजीरवाणे ठरत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी