ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे(Ganeshotsav celebrations at Girish Mahajan’s house). अनेक पाहुण्यांनी यावेळी व्हिजीट केली.गणेशोत्सवाला सुरूवात झालेली आहे. गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये ओढ निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर लय भारीच्या टीमने मुंबईमधील ठिकठिकाणच्या गणपतींचे गणेश भक्तांना दर्शन घडविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. याच भावनेतून लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी ‘गिरगावचा राजा’ला भेट दिली. यावेळी योगायोगाने गिरगावच्या राजाचे मुखदर्शन सोहळा सुद्धा अनुभवण्याचा योग आला. गिरगावच्या राजाचे यंदा ९७वे वर्ष आहे. लवकरच १०० व्या वर्षात या गणेश मंडळाचे पदार्पण होणार आहे. त्याची तयारी आतापासूनच गणेश मंडळाने सुरू केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची मध्यस्थीने आडगाव ट्रक टर्मिनलचा प्रश्न मार्गी
स्थानिक रहिवाशी प्रवीण मंत्री, गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कनुजे व सचिव गणेश लिंगायत यांच्यासोबत लय भारीने संवाद साधला. गणेश मंडळाने गेल्या ९७ वर्षांत पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याची परंपारा सुरू ठेवलेली आहे. गणेशाची मूर्ती शाडूची असते. शिवाय लवकरच शतक सोहळाही येऊ घातलेला आहे. त्यामुळे यंदापासूनच मातीचे मोदक द्यायला मंडळाने सुरूवात केली आहे. या मोदकामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींच्या बिया असतात. पुढील तीन वर्षांनंतर म्हणजे १०० व्या वर्षात गणेश मंडळाचे पदार्पण होणार आहे. त्यावेळी मुंबईभरात विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्याचा, मान्यवरांना रोपांचे वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांना आहेत ‘या’ सवयी, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य !