25 C
Mumbai
Friday, September 8, 2023
घरमहाराष्ट्रनकाश अझीझच्या ढोल ताशाच्या गजरातील 'मोरया' गाण्यावर तुम्ही ही धराल ठेका

नकाश अझीझच्या ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ गाण्यावर तुम्ही ही धराल ठेका

गणेशोस्तव आता अवघ्या काही दिवसांवर आला असून सगळीकडे धामधूम सुरु झाली आहे. ढोल-पथकांची जोरदार तालीम सुरू असलेली पाहायला मिळतेय. सोशल मिडियावर गणरायाच्या स्वागतासाठी अनेक गाणी ऐकू येऊ लागली आहेत. गणरायाची ही गाणी साऱ्या गणेशभक्तांना तल्लीन करून सोडणारी आहेतच अशातच आणखी एका नव्याकोऱ्या गणेशावरील भक्तिगीताने साऱ्यांच्या मनाचा ठाव घेतला आहे. प्रसिद्ध गायक नकाश अझीझने गायलेल्या ‘मोरया’ या भक्तिगीत नुकतेच प्रदर्शित झाले असून मनाचा ठाव घेणारे हे गाणे तुम्हाला देखील ठेका धरायला लावेल.

या ‘मोरया’ गाण्यातून एका गणेशभक्ताने आर्त भावनेने गणरायाला वंदन करत साद घातली आहे. ढोल, ताशांचा गजरात चित्रित झालेल हे गाणं प्रत्येक भक्ताच्या मनाचा ठाव घेईल. ‘मोरया’ हे गाणं लागलं की अर्थात आपोआपच प्रत्येकाचे पाय थिरकू लागतायत. या गाण्यात अनेक गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. अभिनेता डॉ. गौरव भोसले पाटील व अभिनेत्री डॉ. गायत्री भालेकर यांनी या गाण्यात मुख्य भूमिका पाहायला मिळाली.

‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ प्रस्तुत मोरया या गाण्याच्या निर्मितीची धुरा निर्माते विजुतात्या विष्णुपंत बहिरट व प्रमोद अरविंद नाईक यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शक डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा यांनी दिग्दर्शित केलं आहे. तर या गाण्याच्या संगीताची जबाबदारी प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी सांभाळली असून गायक नकाश अझीझ याने त्याच्या दमदार व सुमधुर आवाजात हे गाणं गायलं आहे.
हे सुद्धा वाचा 

साखरपुढ्याला लगबगीने सगळे आले, आता वऱ्हाडी म्हणून कोण कोण येणार परिणीती-राघव चढ्ढाच्या लग्नाला ?
शाहरुखच्या ‘जवान’नं ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडला!
लहानग्या कन्हैय्यांसोबत अभिनेता विकी कौशलनं फोडली दहीहंडी !
हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार आवाजाने चाहतावर्ग तयार केलेल्या नकाश अझीझ या गायकाने साऱ्यांच्या मनावर ताबा मिळवला. आजवर हिंदी सिनेसृष्टीत त्याने बरीच हिट गाणी गायली असून त्याच्या सुमधुर आवाजात त्याने मराठीतील बाप्पाला वंदन करणार ‘मोरया’ हे गाणं गायलं आहे. तर गीतकार मंगेश कांगणे यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी