30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य गीताचा दर्जा मिळालेल्या 'गर्जा महाराष्ट्र माझा'... गीताच्या गीतकाराबद्दल तुम्हाला माहिती आहे...

राज्य गीताचा दर्जा मिळालेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’… गीताच्या गीतकाराबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

जयजय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… (Garja Maharashtra Maja) मराठी मुलुखात कोणताही सामाजिक असो अथवा कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो कार्यक्रमाच्या ठिकाणी लाऊड स्पिकरवर हे गाणे किमान एकदा तरी तुमच्या कानावर पडेल. इतकचं काय अलिकडे तरुणांच्या टी शर्टवर देखील या गाण्याच्या ओळीची कॅलिग्राफी तुम्हाला दिसते. जगात कुठेही असो हे गाणे कानावर पडले की छाती फुलून येते. अंगावर रोमांच उभा राहतो. महाराष्ट्राच्या वीरतेची अनुभूती तूम्हाला या गाण्याचे शब्द कानावर पडले की आल्या शिवाय राहणार नाही.

शाहीर साबळे यांचा आवाज, श्रीनिवास खळे यांचं संगीत असलेले हे गीत लिहीले कुणी हे मात्र सहजपणे कुणाला आठवत नाही. आज महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून राज्य सरकारने गर्जा महाराष्ट्र माझा… या गीताला मान्यता दिली. त्यानिमित्ताने या गीताचे गीतकार यांची देखील आठवण होणे तितकेच गरजेचे आहे. तर हे गीत लिहीले होते कविवर्य राजा बढे (poet Raja Bhade) यांनी. आज शासनाने त्यांच्या गीताला राज्य गीताचा दर्जा (state song of Maharashtra) दिल्याने आज सरकाने त्यांचा मोठा सन्मानच केला असे म्हणायला हवे. (Garja Maharashtra Maja song by poet Raja Bhade has the status of state song of Maharashtra)

मराठी कला क्षेत्रातील एक अजरामर पण काहीसे उपेक्षित असे नाव म्हणजे कविवर्य राजा बढे, त्यांची अनेक गाणी मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवून गेली. आज शिंदे फडणवीस सरकारने राज्य गीताचा दर्जा बहाल केलेले अजरामर गाणे ”गर्जा महाराष्ट्र माझा” हे देखील राजा बढे यांनीच लिहीलेले. कविवर्य राजा बढे यांचे संपूर्ण नाव राजाराम निळकंठ बढे असून १ फेब्रुवारी १९१२ रोजी नागपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. तर ७ एप्रिल १९७७ दिल्ली येथे त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे कार्य अतूलनीय असेच म्हणावे लागेल. कलेच्या कोणते क्षेत्र त्यांनी आजमावले नाही असे नाही. अनेक क्षेत्रात त्यांनी आपली कला सादर केली. कवि, लेखक, नाटककार, अभिनेता, चित्रपट निर्माते तसेच चित्रकार आदी विविध कला क्षेत्रात त्यांनी कार्य केले.

विपूल साहित्य लेखन
साहित्य, नाट्य, चित्रपट विविध क्षेत्रात त्यांनी बहुआयामी असे काम केले. त्यांनी १४ चित्रपटांसाठी गीते लिहीली. तसेच त्यांनी ‘रायगडाचा राजबंदी’ या चित्रपटाची देखील त्यांनी निर्मिती केली होती. इतकेच नाही तर साहित्याच्या प्रांतात देखील त्यांनी विपूल लिखान केले. १८ काव्यसंग्रह, ४ नाटके, ९ संगितीका, ५ एकांकिका, १ कादंबरी, अनेक अनुवाद देखील केले. मराठी साहित्य क्षेत्रातील रविकिरण मंडळाची देखील त्यांनीच स्थापणा केली होती. तसेच अनेक नियतकालिकांमध्ये त्यांनी सहसंपादक म्हणून देखील काम केले होते. त्यांनी सामाजिक विषयांवर विविध टोपण नावांनी अनेक सदरे लिहीली. त्यांनी लिहीलेल्या अनेक गीतांनी मराठी रसिकांवर अधिराज्य केले. रेडिओवर देखील त्यांनी काम केले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आता २५ लाख रुपये; २७ नवांचा सरकारकडे प्रस्ताव नव्या नावांवर देखील विचार

‘लय भारी’च्या शिरपेचात मानाचा तुरा; तुषार खरात यांना अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कार

अभिनेता संदीप पाठकच्या ‘त्या’ गोष्टीने आजीचे डोळे पाणावले; लेकराची झाली आठवण

१.४१ मिनिटांचे राज्यगीत 
कविवर्य राजा बढे यांच्या “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि. ३१) रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  येणाऱ्या शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रुवारी) हे गीत राज्य गीत म्हणून अंगिकारण्यात येणार आहे. या गीतामधील दोन चरणे “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून स्विकारण्यात आले असून हे राज्यगीत १.४१ मिनिटांचे आहे.

असे आहे महाराष्ट्राचे राज्यगीत :-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी