29 C
Mumbai
Wednesday, August 2, 2023
घरमहाराष्ट्रकोल्हापुर जिल्ह्यात दोन दशकांपासून गव्यांचे हल्ले; सुधीर मुंनगंटीवार, अजित पवारांकडे पाठपूरावा करुन...

कोल्हापुर जिल्ह्यात दोन दशकांपासून गव्यांचे हल्ले; सुधीर मुंनगंटीवार, अजित पवारांकडे पाठपूरावा करुन देखील शेतकऱ्यांना न्याय नाही

सध्या राज्यात बिबटे, वाघ, गवे, हत्ती या वन्य प्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. वन विभागाची उदासीनता आणि उपाययोजनांच्या अभावामुळे मणुष्य आणि वन्यप्राण्यांमध्ये संघर्ष वाढलेला आहे. कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात शेतीपिकांचे गव्यांकडून वारंवार होणारे नुकसान, शेतकऱ्यांवरील हल्ले यामुळे तेथील शेतकरी गेल्या दोन दशकांपासून त्रस्त आहेत. शेतीपिकांचे नुकसान आणि मणुष्यावरील हल्ले थांबावेत म्हणून काटेरी तारेचे पोहाळे तर्फ बोरगांव ग्रामपंचायतीने वनविभाग, जिल्हा प्रशासन, राज्य शासन, तत्कालीन विरोधीपक्ष नेते अजित पवार, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वारंवार पाठपूरावा करुन देखील त्याबाबत सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, असा आरोप संदीप खवळे यांनी केला आहे.

‘लय भारी’शी बोलताना संदिप खवळे म्हणाले की, गेली दोन दशके पन्हाळा तालुक्यातील पोहाळे तर्फ बोरगांव ग्रामपंचायत हद्दीसह इतर गावांमध्ये गव्यांच्या कळपांचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. गव्यांच्या कळपांमुळे ऊस, भुईमुग, नाचणी, भात अशा पिकांचे नुकसान दरवर्षी होत आहे. तसेच शेतकऱ्यांवर हल्ले देखील होत आहेत, अनेक शेतकरी गव्यांच्या हल्ल्यामुळे जायबंदी झाले आहेत. काही शेतकऱ्यांचा या हल्ल्यांमध्ये मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे गव्यांचे हल्ले थांबावेत म्हणून आम्ही जिल्हा प्रशासन, वन विभागाकडे वारंवार पाठपूरावा केला. 26 जानेवारी, 2023 रोजी सहयांची मोहिम देखील शेतकऱ्यांनी राबवली होती. वनविभाग या परिसरात गव्यांचे हल्ले रोखण्यासाठी वन सिमेवर चर खोदते पण पावसाळ्यात या खोदलेल्या चरी बुजून जातात आणि गव्यांचे कळप शेतात प्रवेश करतात. त्यामुळे वन सिमेवर काटेरी तारेचे कुंपण करण्याची मागणी स्थानिक गावकऱ्यांची असल्याचे देखील खवळे म्हणाले.

मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे डिसेंबर २०२२ मध्ये वन मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्याकडे याबाबत अर्ज केला. त्यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करावी असे निर्देश प्रधान सचिव (वने) यांना दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे मार्च 2023 मध्ये पुन्हा तसेच तार कंपाऊंड करण्याबाबतच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजूरी देण्यासाठी उपवनसंरक्षक कोल्हापूर आणि मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना सचिवांच्या पत्राची आठवण करुन देत प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

हे सुद्धा वाचा 
नगर जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांची विधानसभेत रंगली जुगलबंदी

गणेशोत्सवापूर्वी चिपी विमानतळावरुन प्रवासी विमानांच्या फेऱ्या वाढणार

भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी भिडे प्यारे  

त्यामुळे पोहाळे तर्फ बोरगांव जंगल सीमेवर तार कंपाऊंडचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी कोल्हापूर डीपीडीसीला पाठवण्याचे आदेश मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर तसेच उपवनसंरक्षक कोल्हापूर यांना देण्याबाबतचे तसेच या प्रकरणी दिरंगाई प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याबाबत आवाज उठवावा म्हणून तत्कालीन विरोधीपक्ष नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निवेदन दिले होते. मात्र त्यानंतर देखील हा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असे संदीप खवळे म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी