30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रवाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे बर्थडे बॉयला पडले महागात

वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे बर्थडे बॉयला पडले महागात

नृत्यांगना गौतमी पाटीलचे नाव सध्या राज्यभरात चर्चेत आहे. तिच्या नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी तरुण तुडूंब गर्दी करतात. त्यामुळे अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन अनेकजण करत असतात. पिंपरी चिंडवडमध्ये एका व्यक्तीने वाढदिवसानिमित्त गौतमीच्या नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले, त्याला पोलिसांनी नकार देऊन ही गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम घडवून आणला. त्यामुळे पोलिसांनी संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पिंपरी चिंचवड मधील कासारवाडी येथील अमित लांडे या युवा कार्यकर्त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मान होईल म्हणून पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. मात्र तरी देखील लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे भोसरी पोलिसांनी लांडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा

कंबरदुखी पाठ सोडेना; जगभरात 84 कोटी लोकांना पाठदुखीचा त्रास !

राहुल गांधी, नाना पटोलेंवर टीका भोवली; आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित

UPSC परीक्षेत महाराष्ट्राचा डंका; 70 अधिक उमेदवारांनी पटकावले यश

गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम पाहण्यासाठी तरुणवर्गाची झुंबड उडते. त्यामुळे अनेकजण गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. तिच्या कार्यक्रमाला हमखास गर्दी होते, त्यामुळे आयोजक देखील गर्दी जमविण्यासाठी गौतमीच्या कार्यक्रमासाठी पसंती दाखवत आहेत. गौतमीच्या कार्यक्रमात अनेकदा गोंधळ उडल्यामुळे चेंगराचेंगरीसारखे प्रकार घडत असल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमासाठी रितसर परवानगी घ्यावी लागते. मात्र पोलिसांनी परवानीग दिली नाही तरी देखील कार्यक्रम घेतल्यामुळे लांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी