24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्रपनवेलजवळ मालगाडीचे डबे घसरले; पाच एक्स्प्रेस धावताहेत उशिराने

पनवेलजवळ मालगाडीचे डबे घसरले; पाच एक्स्प्रेस धावताहेत उशिराने

मध्य रेल्वेवर सिग्नल यंत्रणेत बिघाड, ओव्हरहेड वायर्स निखळणे अशा घटना घडत असल्याने लोकल आणि एक्स्प्रेसचा खोळंबा होत असल्याच्या घटना घडत आहेत. असे असताना  शनिवार (30 सप्टेंबर) रोजी दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान या घटनेविषयी समजातच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर झाल्याचं पाहायला मिळतय. या घटनेमुळे एक्सप्रेसच्या पाच गाड्या उशीरा धावत असल्याची माहिती मध्ये रेल्वेकडून देण्यात आली आहे. दरम्यान ही वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.

शनिवार  दुपारी 3 वाजून 5 मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. यामध्ये वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे डबे रेल्वे रुळावरुन घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान या घटनेविषयी समजातच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

रुळावरुन घसरलेले डबे बाजूला सारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान हे डबे कसे घसरले याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश मध्य रेल्वेकडून देण्यात आलेत. पण या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा खोळंबा झाला आहे. तसेच यामुळे प्रवाश्यांना देखील त्रास होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

या अपघातामुळे पाच एक्सप्रेस रखडल्या आहेत. यामध्ये डाऊन मार्गावरील गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेस ही कळंबोली स्थानकावर थांबवण्यात आली. तसेच एलटीटी-मंगळुरु एक्स्प्रेस ही ठाणे स्थानकावर थांबण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल-सावंतवाडी एक्स्प्रेस ही तळोजा ते पंचानंद स्थानकादरम्यान थांबवण्यात आली आहे. तसेच अप मार्गावरील कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम-निजामुद्दीन एक्स्प्रेस या सोमाठाणे रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा 

२ हजारांच्या नोटांबाबत RBI चा मोठा निर्णय, नोटा बदलण्यासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
विदेश दौऱ्यांवरून आदित्य ठाकरेंनी केली सरकारची धुलाई!
नितीश कुमारांचे आता महाराष्ट्रात लक्ष्य; JDU चा मुंबईत संवाद मेळावा

लोकलवर परिणाम नाही
लांब पल्ल्याच्या गाड्यांवर जरी परिणाम झाला असला तरीही लोकलच्या वेळापत्रकावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाल्याचं यावेळी मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. दिवा ते पनवेल या मार्गावरील अप आणि डाऊन वाहतूक देखील सुरळीच सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच लवकरच डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रेल्वे या नियोजित वेळेमध्येच स्थानकावरुन सुटणार आहेत. पण अप मार्गावरील मेल एक्सप्रेस गाड्यांना काही वेळ प्रतीक्षा करावी लागेल, असं मध्य रेल्वेने म्हटलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी