29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका

गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका

टीम लय भारी

नाशिक : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)  हे सतत शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. नाशिकमध्ये सदाभाऊ खोत यांनी कांदा परिषद भरवली होती. या परिषदेत गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)  यांनी शरद पवारांवर पुन्हा एकदा खालच्या स्तरावर जाऊन टीका केली.”शरद पवारांना लाथ मारा, खाली पाडा, कांद्याचा वास द्या, म्हणजे ते जागे होतील. म्हणजे आपल्या कांद्याला भाव मिळेल, असं बाळासाहेब म्हणाले होते. मग बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आपल्या वडिलांच्या आदेशाचं पालन करणार का?” असं पडळकर यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेमुळे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्ह आहे.

या परिषदचे ‘एक आठवड्यात कांदा प्रश्न सुटला नाही तर मंत्रालय समोर आंदोलन करणार, असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे.  ते म्हणतात की,  ‘आमच्या काळात कांद्याचे दर पडले तर आम्ही 2 रुपये कांद्याला अनुदान दिले. अनुदानाच्या माध्यमातून 200 कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिले.

केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील आम्ही कांदा दर कोसळल्यानंतर निर्यात प्रोत्साहन दर देखील दिले. कांदा व्यापाऱ्यावर धाडी पडत असताना मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सांगितले हे थांबवा. सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असताना देखील सध्याचं सरकार काही करत नाहीये.

हे सुद्ध वाचा: 

पावसाळ्यातील आजारांना तोंड देण्यासाठी राज्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज

Uddhav Thackeray Reaches Out to Smaller Parties Amid Rajya Sabha Race

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी