27 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरमहाराष्ट्रअजित पवार किस झाड की पत्ती; पवार घराणं राजकारणातून उखडून टाकणार!

अजित पवार किस झाड की पत्ती; पवार घराणं राजकारणातून उखडून टाकणार!

विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यात जोरदार सामना रंगला आहे. विधानपरिषद गोपीचंद पडळकर यांनी पवार यांच्यावर टीका केली होती. त्याबदद्ल अजित पवार यांनी अशा उपसुंभांवर बोलायला मी रिकामा नाही म्हणत त्यांचे बारामतीमध्ये डिपॉझीट जप्त झाल्याची आठवण करुन दिली. त्यावर पडळकर यांनी देखील प्रत्यूत्तर देत लोकशाहीच्या माध्यमातून पवार घराणं राजकारणातून उखडून टाकणार असे म्हटले आहे. (Gopichand Padalkar’s reply to Ajit Pawar’s criticism)

आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार, शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करत पवार कुटुंब चोर असल्याचे म्हटले होते. तसेच कृषी प्रदर्शनामध्ये अजित पवार यांनी पैसे मागितल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला होता. त्यावर अजित पवार यांनी पडळकरांवर बोलताना जो माझ्यावर बोलतोय तो काही मोठा नेता नाही. कोण कुठला उपटसुंभ त्याचं डिपॉझीट जप्त करुन त्याला मी पाठवलयं अशी बोचरी टीका केली होती.

हे सुद्धा वाचा 

सरकारी कर्मचाऱ्यांना धनलाभ; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

एसी लोकलचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवाशांची कोंडी

ढासू आयडिया : पाकिस्तान सीमेवर आता हवेतून गोळ्या झाडणाऱ्या डीआरडीओच्या 25 एलजी ड्रोन या फ्लाइंग मशीन गनची गस्त !

अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर आमदार पडळकर यांनी देखील अजित पवार यांच्यावर पलटवार केला. लोकशाहीच्या माध्यमातून पवार घराणं राजकारणातून उखडून काढण्याचे काम मी हाती घेतलं आहे. पवार कुटुंबाला फोडून काढण्याचे मी काम करत आहे. त्यांना रडकुंडीला आणलं नाही तर नाव गोपीचंद नाही अशी जणू प्रतिज्ञाच गोपीचंद पडळकरांनी केली.
डिपॉझीट जप्त केले असे सतत सांगत बसणे म्हणजे हा माज आहे. जनतेने इंदिरा गांधी यांना हरवलं मग अजित पवार किस झाड की पत्ती, असे देखील गोपीचंद पडळकर म्हणाले.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी