30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम ३ जून रोजी गोपीनाथ गडावर होणार

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम ३ जून रोजी गोपीनाथ गडावर होणार

टीम लय भारी 

परळी  : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आठवा स्मृतिदिन उद्या 3 जून रोजी आहे. गोपीनाथ मुंडे (Gopinathrao Munde)  यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनी म्हणजे येत्या ३ जून रोजी लोकनेत्याच्या अभिवादनासाठी आमदार, खासदारांसह विविध मान्यवर नेते तसेच राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर याठिकाणी उसळणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकज मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमाची सध्या जय्यत तयारी करण्यात येत आहे. (Gopinathrao Munde Memorial Day)

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्याच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते आपल्या लाडक्या लोकनेत्याला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. मध्यंतरी दोन वर्षे कोरोना महामारीमुळे गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम होऊ शकले नव्हते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

अशारीतीने कार्यक्रम पार पडणार

३ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वा. ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे तद्नंतर दर वेळेप्रमाणे समाजातील वंचित, पिडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. सर्व आजी माजी आमदार, खासदार, मान्यवर नेते मंडळी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सामाजिक उत्थानाचा वसा

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आतापर्यंत लोकोपयोगी आणि सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श पायंडा पाडला आहे. कोरोना काळात सेवा यज्ञातून दिलेला मदतीचा हात, महा आरोग्य शिबीर, अपंगाना साहित्य वाटप, बेरोजगारांना नोक-या, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत, आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या परिवाराला मदत, सामुदायिक विवाह सोहळा आदी विविध उपक्रम राबवून सामाजिक उत्थानाचा वसा घेतला आहे.येत्या ३ जून रोजी होणा-या कार्यक्रमास सर्व नागरिक तसेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


हे सुद्धा वाचा :

पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत : गोपीनाथ गडाचं प्रोफाईल ठेवण्याचं जनतेचं आवाहन

रखडलेले बांधकाम ३ महिन्यात पूर्ण न केल्यास कारवाई होणार : धनंजय मुंडे

2023 अखेरपर्यंत किंवा 2024 सुरुवातीपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण करणार :  धनंजय मुंडे

धनंजय मुंडे आणि रोहित पवार यांच्या उपस्थितीत ‘मिशन वात्सल्य आणि बाल संगोपन मेळावा’ संपन्न

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी