29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीवरुन दीर्घकाळ रंगलेला वाद, अधुनमधून होणाऱ्या शाब्दिक लढाया आणि काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विमानातून प्रवास करण्यास नाकारलेली परवानगी, अशा अनेक कारणांमुळे आमनेसामने येणाऱ्या महामहिम भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यातील खुंटलेला संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्याने सध्या राज्य मोठ्या संकटात सापडले आहे. अशावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील संवाद पुन्हा सुरु होणे, ही सकारात्मक बाब ठरु शकते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असा मजकूर राज्यपालांच्या पत्रात आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच विरोधी पक्ष सरकारला फारसे सहकार्य करताना दिसत नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारशी संवाद साधण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे. राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांचे आतापर्यंत फारसे पटलेले नाही. मात्र, आता संकटाच्या काळात तरी हे दोघे हातात हात घालून चालणार का, हे पाहावे लागेल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी