32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रJayant Patil : शेतकरी चिंताग्रस्त आहे पण सरकारने एक 'दमडी' दिली नाही...

Jayant Patil : शेतकरी चिंताग्रस्त आहे पण सरकारने एक ‘दमडी’ दिली नाही – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन‍ झाले. त्यांनी गणपतीची मनोभावे पूजा केली. देशातील न्याय व्यवस्था उत्तम रहावी तसेच महापूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, महागाईचा राक्षस नष्ट व्हावा असे साकडे गणपती बाप्पाला घातले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन‍ झाले. त्यांनी गणपतीची मनोभावे पूजा केली. देशातील न्याय व्यवस्था उत्तम रहावी तसेच महापूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा मिळावा, महागाईचा राक्षस नष्ट व्हावा असे साकडे गणपती बाप्पाला घातले. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर आज दोन वर्षांनंतर राज्यभरात गणेशोत्सव मोठया जल्लोषात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले माध्यमांशी बोलतांना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आमच्या सरकारने कधीही कोणत्याही सणांवर बंदी आणली नाही. मात्र कोरोना अटोक्यात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला निर्बंध लावावे लागले हाेते.

यावर्षी कोरोना कमी झाल्यामुळे हे निर्बंध हाटवण्यात आले आहेत. मात्र सत्ताधारी पक्ष या परिस्थितीवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही विदर्भातील अनेक ठिकाणी दौरे केले. त्या ठिकाणी पूरग्रस्त भागात अजून मदत पोहोचलेली नाही. सरकारने घोषणा केली. मात्र एक दमडी देखील दिली नाही. त्यामुळे विदर्भातला शेतकरी चिंताग्रत आहे. शेतकऱ्याला वेळेवर मदत मिळत नसेल तर त्या मदतीला काय अर्थ आहे असा संतप्त सवाल आज जयंत पाटील यांनी सरकारला विचारला.

हे सुद्धा वाचा

VIDEO : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या घरचा बाप्पा

Ashtavinayaka Darshan : आठवा गणपती महडचा ‘वरदविनायक’

VIDEO : अष्टविनायक दर्शन : पाचवा गणपती ओझरचा ‘ विघ्नेश्वर’

सत्तांतराबद्ल पुढारी समाधानी असतील मात्र सामान्य जनता मात्र समाधानी नाही असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. पूरहानी झाली आहे. त्या संबंध‍ी कार्यकर्त्यांकडून माहिती घेत आहोत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटेमध्ये सभासद नोंदणीचे काम सुरु आहे. सदस्यत्व नोंदणीचे काम सर्व जिल्हयात सुरु आहे. मी विदर्भातल्या बऱ्याच‍ ठिकाणी भेटी दिल्या. गडचिरोली, वर्धा अनेक ठिकाणी मदत मिळाली आजही गडच‍िरोली मधील अहेरी भागात मोडलेल्या घरात लोक राहत आहे. लोक चिंतातूर आहेत. आपल्या परीने लोक मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमच्या सरकारने कोणत्याच धर्मातील लोकांना कधी विरोध केला नव्हता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी