29 C
Mumbai
Tuesday, May 9, 2023
घरमहाराष्ट्रH3N2 फ्ल्यू संदर्भात तात्काळ उपाययोजना करा; अजित पवारांची सरकारकडे मागणी

H3N2 फ्ल्यू संदर्भात तात्काळ उपाययोजना करा; अजित पवारांची सरकारकडे मागणी

केंद्र शासनाच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ‘एच3 एन2’ (H3N2)फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच3 एन2’ फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. तरी या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) यांनी सभागृहात केली.

एच3एन2 फ्ल्यूच्या प्रकारातील शीतज्वराची महाराष्ट्रासह देशात लाट आलेली आहे. वातावरणातील बदल, धुळीचे प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्दी, तीव्र खोकला, ताप, अंगदुखी याशिवाय मळमळ, उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी एच3एन2 फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एच3एन2 फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. या आजाराने महाराष्ट्र बाधित होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

कर्नाटक व हरियाणामध्ये या फ्ल्यूने दोन मृत्यु झाल्याची घटना घडली असून पाच वर्षाखालील मुले 65 वर्षावरील वृध्द व्यक्ती, गर्भवती महिला याशिवाय हृदयरोग, मधूमेह व दम्याच्या रुग्णांना याची लवकर लागण होत आहे. यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आवाहन केलेले आहे. राज्यातही ‘एच३एन२ चे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. कोवीड-19 रोगाचा अनुभव विचारात घेता झपाट्याने वाढलेले प्रमाण व वाढलेली रुग्ण संख्या यांचा विचार करता राज्य शासनाने एच3एन2 बाबतही योग्य उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते पवार यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : 

कोरोना काळात नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या ‘एमपीएससी’च्या उमेदवारांना न्याय द्यावा : अजित पवार

खत खरेदी करताना जात नोंदविण्याच्या प्रकारावर अजित पवार आक्रमक; अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

कोरोना नंतर आता इन्फ्लुएंझा व्हायरसचा धोका वाढला! भारतात दोघांचा मृत्यू

नव्या व्हायरसचे कोरोना कनेक्शन

ताप, सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल अथवा नाक वाहत असेल तर वेळीच सावधान व्हा. थकवा, उलटी, घशात दुखणे, शरीरात ताकद न राहणे, डायरियासारखी लक्षणे असतील तर तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे जावे. ही लक्षणे साधारण आठवडाभर दिसून येतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हा व्हायरस संक्रमित होणारा असून खोकणे अथवा शिंकणे यामुळे पसरू शकतो. यामुळेच कोरोनाच्या लक्षणांशी याची तुलना करण्यात आली आहे. त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी