33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : 'या' आहेत महत्त्वाच्या ठळक बाबी

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2023 : ‘या’ आहेत महत्त्वाच्या ठळक बाबी

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारचा पहिला अर्थसंकल्प बुधवार (दि.9) रोजी सादर होत आहे. या सरकारच्या अर्थसंकल्पात शाश्वत शेती, शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री देवेंद्र फडवणीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. फडणवीस यांनी संत तुकाराम महाराजांना वंदन करत अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. हे बजेट पेपर लेस असून आय पॅड वर बजेट सादर केले जात आहे. अर्थसंकल्पात पाच महत्तवाच्या बाबी असून पंचामृत बजेट असल्याचे फडणवीस म्हणाले. (Highlights of Maharashtra Budget 2023)

1) शाश्वत शेती
2) महिला आदिवासी यांचा शाश्वत विकास
3) भरीव गुंतवणूक
4 रोजगार निर्मिती
5 पर्यावरण पूरक वातावरण

अशा पाच ठळक बाबी या अर्थसंकल्पात असून, या अर्थसंकल्पाला पंचामृत बजेट असे म्हटले आहे.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे


1) महाराष्ट्र गो सेवा आयोगाची स्थपणा करण्यात आली आहे.

2) जलयुक्त शिवार योजना 2 सुरू करणार.

3) लाडकी लेक योजना सुरू करण्यात येणार असून या योजनेतून मुलींना दर वर्षी आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

4) 37 लाख बचत गट कार्यरत आहेत.

5) आशा वर्करचे मानधन दीड हजार रुपयांची वाढवणार.

6) महिलांसाठी शक्ती सदन बांधणार, यात पीडित महिलांना मदत करणार.

7) महात्मा ज्योतिबा वैद्यकीय योजनेची रक्कम 5 लाख करणार.

8) राज्यात आपला दवाखाना सुरू करणार.

9) बार्टी , सारथी , म्हाज्योति आर्थिक महामंडळ आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

10) सर्वांसाठी घरे, ग्रामीण भागात 10 लाख घरे बांधणार. या वर्षी 4 लाख घरे बांधणार.

11) मोदी घरकुल योजना राबवणार, Obc समाजासाठी घरे बांधणार.

12) कल्याण ते मुरबाड रेल्वे ला केंद्राने मान्यता दिली आहे.

13) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल 2025 पर्यंत पूर्ण करणार.

14) राज्यात 75 हजार पदे रिक्त आहेत ती पदे तात्काळ भरणार.

15) राज्यात 14 नवीन मेडिकल कॉलेज उभारणार.

16) महाराष्ट्र सायबर यंत्रणा बळकट करणार.

17) कोतवाल यांना 15000 मानधन देणार.

18) पाच जोत्रीलिंग विकासाची काम सुरू करणार.

19) श्री. नामदेव महाराज कीर्तनकार योजना राबवण्यात येणार.

20) महाराष्ट्र 3 ठिकाणी जंगल स्मारकं उभारणार.

21) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार.

22) स्वर्गीय शंकरराव चव्हाण पत्रकार योजनेत 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

 

हे सुद्धा वाचा

अवघ्या १ रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला १२ हजार; शिंदे-फडवणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा

राज्यभरात उद्यानांमधून उलगडणार शिवचरित्र! शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा

विधीमंडळात गदारोळ; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मविआ आक्रमक

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी