33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रNana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर-...

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. दोन महिने होत आले तरी देखील शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजून मदत दिलेली नाही. तसेच राज्यात भाजपचे सरकार आहे. भाजप सरकार हे हिंदुत्त्वाचा पुरस्कार करते.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. दोन महिने होत आले तरी देखील शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजून मदत दिलेली नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. शिंदे-फडणवीस सरकार हिंदुत्त्वाचा पुरस्कार करते. केवळ हिंदुत्त्वाच्या मुद्यावर शिंदे-फडणवीस राजकारण करत आहे. मग राज्यातील हिंदू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई का ? देत नाही असा प्रश्न काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. हिंदुंचे सरकार आले आहे. सण, उत्सवाचा आनंद लुटा असा प्रचार भाजप करत आहे. मग हिंदू शेतकरी मदतीपासून वंचीत का आहे? असा खडा सवाल नाना पटोले यांनी सरकारला विचारला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Nana Patole : हिंदुत्त्वाचा डंका मिरवणाऱ्या इव्हेंटबाज सरकारनेच हिंदू शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर- नाना पटोले

या वेळी नाना पटोले म्हणाले की, राज्यातले सरकार हे इव्हेंटबाज सरकार आहे. त्याला शेतकऱ्यांचे काही देणेघेणे नाही. अजून पंचनामे सुरु आहेत. भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस यवतमाळमधील एका शेतकऱ्याच्या घरी राहिले. पण त्यानंतर त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी सहानुभूती दाखवण्याचा एक कार्यक्रम जाहिर केला. पण तो केवळ इव्हेंट होता. इव्हेंट आयोजित करुन शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

Chief Minister : दोन माजी मुख्यमंत्री भेटीने, राजकारणात संशय बळावला

Ganeshotsav 2022, : ‘कुठे राज ठाकरेंचे विचार आणि कुठे हा फडतूस कार्यकर्ता…’

Ajit Pawar :अजित पवारांनी सांगितल्या लहाणपणीच्या करामती, लोकांमध्ये पिकला हशा!

कृषीमंत्र्याला शेतकऱ्याची जाण असायला हवी. परंतु आताच्या नवीन सरकारमधील मंत्री तसे नाहीत. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना शेती विषयक काहीच ज्ञान नाही. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कसे समजणार ? त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार ? एखादा इव्हेंट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. भाजप विरोधी पक्षातील सरकारे पाडण्याचा प्रश्न करत आहे. त्यासाठी ते काळया पैशांचा वापर करत आहेत.

एकनाथ शिंदे सोबत बंडखोरी केलेल्या प्रत्येक आमदारला 50 कोटींची ऑफर देण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपने 3500 कोटींहून अधिक खर्च केला. इतका पैसा भाजपकडे येतो कुठून? आता भापचीच ईडी आणि सीबीय चौकशी केली पाह‍िजे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता भाजपला आणि बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी