30 C
Mumbai
Tuesday, May 16, 2023
घरमहाराष्ट्रआमदार सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत हिरकणी कक्ष सुरू

आमदार सरोज अहिरेंच्या तक्रारीनंतर अवघ्या 24 तासांत हिरकणी कक्ष सुरू

शुक्रवारी (10 मार्च) विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड - पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज अहिरे व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला.

नुकतीच देवळाली विधानसभेच्या विद्यमान आमदार माझ्या सहकारी सरोज अहिरे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या 5 महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या असता त्यांना हिरकणी कक्षात ज्या असुविधाना तोंड द्यावे लागले होते. त्या संदर्भात त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार दोखल केली होती. येत्या २४ तासात सुसज्ज असा हिरकणी कक्ष उपलब्ध करून देईल अशी ग्वाही तानाजी सावंत यांनी त्यावेळी दिली होती. त्याप्रमाणे शुक्रवारी (10 मार्च) विधापरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आया, नर्स, डॉक्टर, स्वच्छ बेड – पाळणा व इतर सुविधांनी सुसज्ज असा हिरकणी कक्ष सरोज अहिरे व त्यांच्या बाळाला उपलब्ध करून देण्यात आला.

केवळ सरोज अहिरेच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी अनेक महिलांना हिरकणी कक्षावर अशा प्रकारच्या समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागते. ही बाब लक्षात घेत बुधवारी‎ महिलादिनाचै औचित्य साधून‎ जिल्हाधिकारी कार्यालयात हिरकणी‎ कक्ष सुरु करण्यात आला.‎ शासकीय कार्यालयांत‎ असणाऱ्या महिला कर्मचारी,‎ अभ्यागत म्हणून येणाऱ्या‎ महिलांपैकी स्तनदा माता असणाऱ्या‎ महिलांना बालकांना स्तनपान‎ करण्यासाठी सुविधा नसल्याने‎ गैरसोयीचा सामना करावा लागत‎ होता.

हे सुद्धा वाचा

क्रिप्टोकरन्सीला मोदी सरकारची मान्यता आहे का? जाणून घ्या नवा कायदा …

शुभमनच्या सिक्सने बॉल हरवला अन् नेटकऱ्यांनी ट्विटर गाजवलं

भाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; ‘टीडीएम’ चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

बीड बसस्थानकात असलेला‎ व जिल्हा पोलिस अधिक्षक‎ कार्यालयात असलेला कक्ष बंद‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ स्वरुपात होता. यामुळे स्तनदा‎ मातांना उघड्यावर बालकांना‎ स्तनपान करावे लागत होते. यामुळे‎ त्यांची कुचंबन होत होती. याबाबत‎ दिव्य मराठीने 6 मार्चच्या अंकात‎ वृत्त प्रसिद्ध केले होते. याची तत्काळ‎ दखल घेऊन जिल्हाधिकारी दीपा‎ मुधाेळ यांनी जिल्हाधिकारी‎ कार्यालयात हिरकणी कक्ष तयार‎ करण्याचे आदेश दिले होते. यानंतर‎ तातडीने हा कक्ष तयार केला.‎

एसटीकडूनही दखल‎
दरम्यान, बसस्थानकातील हिरकणी‎ कक्ष कायम कुलूप बंद असल्याची‎ बाब दिव्य मराठीने निदर्शनास‎ आणून दिल्यानंतर राज्य परिवहन‎ महामंडळाचे विभागीय नियंत्रक‎ अजय मोरे यांनीही याची दखल‎ घेतली. कक्ष सुरु ठेवण्याबाबत‎ त्यांनी सूचना दिल्या आहेत.‎

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी