32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरमहाराष्ट्रJitendra Awhad : विनयभंग किती खरा किती खोटा, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:हूनच केला...

Jitendra Awhad : विनयभंग किती खरा किती खोटा, जितेंद्र आव्हाडांनी स्वत:हूनच केला व्हिडीओ जारी

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ उठले आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा व्हिडीओच ‘लय भारी’ ला पाठवला आहे. त्यामुळे आता विनयभंग किंती खरा आणि किती खोटा हाच प्रश्न उपस्थित झाला आहे.

हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद करणे आणि प्रेक्षकांना मारहाण करण्याच्या आरोपाखाली जितेंद्र आव्हाड यांना गेल्या चारच दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यानंतर ते जामीनावर बाहेर आल्यानंतर आता, त्यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर कलम 354 अंतर्गत त्यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओच त्यांनी ‘लय भारी’ ला पाठविला आहे. या व्हिडीओमध्ये या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या कारमध्ये बसलेले दिसत आहेत. तर कारच्या बाजूने जितेंद्र आव्हाड गर्दीतून बाहेर पडताना दिसत आहेत. यावेळी संबंधीत महिला त्यांच्या समोर येऊन उभी राहिलेली दिसते. तेथे प्रचंड गर्दी असल्याने जितेंद्र आव्हाड हे गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यावळी काही पोलिस कर्मचारी देखील त्या व्हिडीओत गर्दी हटविताना दिसत आहेत. त्याचवेळी जितेंद्र आव्हाड यांच्या समोर ती महिला उभी असल्याने त्या महिलेला ”धक्काबुक्कीत कशाला येता, जरा साईडला व्हा ना” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले, आणि महिलेला बाजूला केले. या व्हिडीओत मुख्यमंत्र्यांच्या कारच्याबाजूला झालेल्या गर्दीतून वाट काढतानाचा जितेंद्र आव्हाड यांचा हा प्रसंग दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

PHOTO: …म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!

T20 World Cup Final : 1992 चा फ्लॅशबॅक फेल! इंग्लंड टी20 क्रिकेटचा नवा बादशाह

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन… असा आहे जुही चावलाचा प्रवास

माझी बदनामी करण्याच्या हेतूने हे षडयंत्र केले असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले, आव्हाड यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. त्यामुळे हर हर महादेव चित्रपट प्रकरणी त्यांना अटक केल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. हे अतिशय वाईट राजकारण केले जात असून आता विनयभंगाचे कलम लावून पोलिसी अत्याचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेकदा विनयभंग कायद्याचा गैरवापर करुन एखाद्या व्यक्तीला बरबाद करण्याचा देखील कुटील डाव खेळला जातो, त्यामुळे आव्हाडांवर देखील असा कुटील डाव खेळण्याचा प्रकार केला जात नाही ना? आव्हाडांवर दाखल केलेला गुन्हा देखील किती खरा आणि किती खोटा हे को़डेच म्हणावे लागेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!